शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रिंटही घेता येईल.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सुद्धा शाळा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. आणि दुसऱ्या लाटेच्या अति प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तरी, विद्यार्थ्यांच्या शालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात येणार असून, निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. महाराष्टाचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती शिक्षण मंडळाने दिली. दुपारी एक वाजल्यापासून १० वीचे विद्यार्थी ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी उत्सुक आहेत, मात्र एकाचवेळी बऱ्याच ठिकाणाहून विद्यार्थांनी निकालाच्या साईटवर गर्दी केल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊन सुद्धा अनेकांना तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी बैचेन झाले असून, त्यांचे पालक साईटच्या अडचणीमुळे हैराण झाले आहेत.
इयत्ता १० वीचे प्रविष्ट हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक विविध माध्यमातून, एकाच वेळी निकाल पाहत असल्याने साईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आल्याने हा प्रकार घडून आला आहे. साडेतीन तास होऊन गेल्यावर देखील विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आलेला नाही. आता पुढील अर्ध्या तासात हा निकाल पाहात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितली आहे.