24.6 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraप्रवाशांसाठी एसटी महामंडळाची स्पेशल भेट

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची स्पेशल भेट

२९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये जादा बसेस सोडण्यात येणार असून, या जादा सोडण्यात येणाऱ्या गाडया आरक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत.

कोरोना काळामध्ये एस.टी सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ठराविक फेऱ्या सुरु करण्यात आल्या होत्या. हळू हळू एस टी ची सेवा पूर्ववत सुरु झाली आहे. गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांसाठी एसटी धावल्यामुळे अनेकांना गावी गणपतीला जाणे शक्य झाले. आणि त्याचा आर्थिक फायदा एसटी मंडळाला सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे गणपती प्रमाणे, येणाऱ्या दिवाळी सण आणि येणाऱ्या सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या सहलीसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारातून दररोज सुमारे जादा १ हजार गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये जादा बसेस सोडण्यात येणार असून, या जादा सोडण्यात येणाऱ्या गाडया आरक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांनी या जादा गाड्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दिवाळीची सुट्टी इतर सुट्ट्यापेक्षा मोठी असल्याकारणाने अनेक प्रवाशी सहकुटुंब, आणि मित्रपरिवारासहित महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देतात.  तर अनेक जण आपापल्या गावी जातात. सुरक्षित प्रवास आणि किफायतशीर दर म्हणून प्रवासी प्रथम स्थान एसटीतून प्रवास करण्याला देतात.मागील वर्षीपासून राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशांनी पर्यटनाकडे पूर्णत: पाठच फिरवली होती. मात्र यंदा महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्याव्यतिरिक्त राज्यभरातील आगारातून दररोज १००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने आगाऊ आरक्षणामध्ये वाढ झाली आहे, प्रवाशांसाठी ती स्पेशल भेटच ठरणार आहे.

सलग सुट्ट्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता गाड्यांचे योग्य पूर्व नियोजन करा,  सर्व बसेस सुस्थितीत ठेवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, असे निर्देश ॲड. परब यांनी एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्याचप्रमाणे, प्रवाशांनीही प्रवासादरम्यान मास्क लावणे, सॅनिटाईजचा वापर आदी कोरोना निर्बंधाचे पालन करने अनिवार्य आहे,  अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या http://public.msrtcors.com/ व MSRTC Mobile Reservation App या अधिकृत संकेतस्थळ व मोबाईल अँपवर जाऊन पूर्वनियोजन करून ठरलेल्या प्रवासाचे आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular