राज्यातील १७ लाख सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी आज आणि उद्या २३ आणि २४ फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारला आहेत. कर्मचा-यांच्या मागण्यां बाबत सरकार उदासिन दिसून आले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटननेने बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना काळात सरकारी, निमसरकारी, शासकीय व शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. कोरोनाचा प्रभाव जास्त असताना सुद्धा वेळप्रसंगी कौटुंबिक तसेच वैयक्तिक संकटांचा सामना करून शिक्षकांनी या भयंकर महामारीच्या काळात आपली कामगिरी चोखपणे बजावली. परंतु, ठाकरे सरकारने या तीन वर्षामध्ये शिक्षकांच्या मागण्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या रोषाला कारणीभूत ठरले आहे. म्हणून संपामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद विद्यार्थी ,शिक्षक व संस्था यांचे हित लक्षात घेता सक्रिय पाठिंबा दिला आहे.
आदिवासी व नक्षलग्रस्त भागात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक स्तर वेतनश्रेणी लाभ देणे, , डीसीपीएस/एनपीएस रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटीकरण /आउटसोर्सिंग बंद करणे,अंशकालीन व कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करणे, शिक्षकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पदोन्नती लागू करणे, बक्षी समितीने शिफारस केलेला खंड २ जाहीर करू लागू करणे, ३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ लागू करणे.
वरील मागण्यांसाठी शिक्षक मध्यवर्ती समन्वय संघटनांच्या विचारविनिमयातून २३ व २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यव्यापी संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा सक्रिय पाठिंबा आहे. शिक्षक आमदार नागो गाणार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष वेणूनाथ कडू, कोकणविभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष एस.एस.पाटील,कार्यवाह पी.एम्.पाटील,कार्याध्यक्ष किरण देशपांडे यांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.