27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraविद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवणार

विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवणार

कोरोना काळानंतर साधारण दीड वर्षानंतर कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येऊ लागल्याने अखेर सर्व धार्मिक स्थळानंतर, शैक्षणिक संस्था सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना नियमावलीमध्ये सुधारणा घडवून त्याप्रमाणेच पालन करून शाळा आणि कॉलेज हळू हळू पूर्वस्थितीमध्ये येत आहेत. शिक्षण विभाग विद्यार्थी आणि पालक शाळांकडे सकारात्मकतेने वळावे यासाठी विविध योजना राबविताना दिसत आहेत.

शाळांमध्ये हजेरीसाठी सक्ती केलेली नसून, पालकांच्या परवानगी शिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार असल्याची नियमावली जाहीर केली आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी महास्टुडंट ऍप विकसित केले आहे. या ऍपचा वापर सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने सर्व शैक्षणिक संस्थाना दिल्या आहेत.

शालेय शिक्षण विभागाकडून महास्टुडंट ऍपच्या वापरास मान्यता देण्यात आल्याचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहाय्याने राज्यामध्ये सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने विकसित केलेल्या परफॉर्मन्स ग्रेडींग इंडेक्समध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यासाठी गुण आहेत. त्यामुळे राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये शाळांच्या विद्यार्थी, शिक्षकांच्या माहितीच्या आधारे राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महास्टुडंट हे ऍप विकसित केले आहे. आणि जास्तीत जास्त तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने कार्यपद्धती समजून घेऊन, प्रमाणत त्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होईल.

RELATED ARTICLES

Most Popular