28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriरत्नागिरीत महाविकास आघाडी आक्रमक, पालिकेवर धडक

रत्नागिरीत महाविकास आघाडी आक्रमक, पालिकेवर धडक

नागरिकांनी तक्रारी करूनही पालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही हे गंभीर आहे.

शहरातील विविध समस्यांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. पाण्याची अभूतपूर्व टंचाई, शहरात डेंगीची साथ पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नालेसफाई यांसह विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी पालिकेवर धडक मारली. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, यापुढचे आंदोलन शांततेत होणार नाही, असा इशाराच महाविकास आघाडीने दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, काँग्रेसचे दीपक राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेवर धडकले.

यामध्ये मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पालिकेकडून तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हे टँकर सत्तेत असणाऱ्या काही पदाधिकऱ्यांच्या प्रभागातच आहेत, असा आरोप बंड्या साळवी यांनी केला. अन्य प्रभागांमध्ये पाणीटंचाई नाही का, असा थेट सवाल त्यांनी केला. यापूर्वी शहरात अशी परिस्थितीत नव्हती. सर्वांना समान न्याय मिळत होता. प्रत्येक प्रभागात टँकरचे योग्य नियोजन झाले पाहिजे, अशी ताकीद देण्यात आली. शीळ धरण ते पंपिंग हाऊसपर्यंत पाईपलाईन टाकण्यास उशीर का होत आहे? वर्षभरापासून हे काम का रखडले आहे? असा सवाल साळवी यांनी मुख्याधिकारी बाबर यांना केला.

या कामासाठी फेब्रुवारीमध्ये दुसऱ्यांदा मंजुरी मिळाली असताना ७ मे रोजी मतदान झाल्यानंतर तत्काळ काम का सुरू झाले नाही. हे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावे अन्यथा फ्लोटिंग पंपही वाहून जातील असेही पदाधिकाऱ्यांना सांगितले. शहरात डेंगीची मोठ्या प्रमाणात साथ पसरली आहे. ग्रामीण भागातील १० टक्के; परंतु १० टक्के शहरी भागातील रुग्ण आहेत. याचा अर्थ शहरात डासप्रतिबंध फवारणी होत नाही. नालेसफाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच डासांची उत्पत्ती होऊनही साथ पसरली आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही पालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही हे गंभीर आहे, असे साळवी यांनी सुनावले.

RELATED ARTICLES

Most Popular