25.5 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeSportsपुढीलवर्षी ही जर्सी कोणती असेल, ते येणारा काळच सांगेल – धोनी

पुढीलवर्षी ही जर्सी कोणती असेल, ते येणारा काळच सांगेल – धोनी

रवींद्र जडेजाने फॉर्मवर लक्ष केंद्रित केल्यामुळे धोनीकडे कर्णधारपद सोपवले.

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून परतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे नशीब पुन्हा चमकायला सुरुवात झाले आहे. चार वेळा आयपीएल विजेता कर्णधार धोनी रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नाणे फेकसाठी मैदानात उतरला होता. एम.एस. धोनीला नाणेफेक करताना पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला. चाहत्यांचा आवाज एवढा मोठा होता कि, टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसनला धोनीचा आवाज ऐकणे देखील अशक्य बनले होते. यादरम्यान धोनीने सांगितले की, तो पुढील २०२३ वर्षीदेखील आयपीएल खेळणार आहे.

रवींद्र जडेजाने फॉर्मवर लक्ष केंद्रित केल्यामुळे धोनीकडे कर्णधारपद सोपवले. आयपीएलच्या आधी धोनीने जडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जेव्हा धोनी नाणेफेकसाठी आला तेव्हा मॉरिसनने त्याला विचारले की,  भविष्यात यलो जर्सी म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे का?

यावर धोनीने उत्तर देताना म्हटले की, पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्येही तुम्ही मला पिवळ्या जर्सीत पाहाल. तथापि, पिवळी ही जर्सी कोणती असेल,  हे येणारा काळच सांगेल. यामुळे धोनी पुढच्या वर्षीदेखील आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघासोबत असणार हे स्पष्ट झाले आहे, पण तो कोणत्या भूमिकेत असेल हे त्याने अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार धोनीने संवाद साधला. त्याने फलंदाजांची स्तुती केली. २०२ ही चांगली धावसंख्या होती. जेव्हा तुम्ही अशी धावसंख्या उभारता तेव्हा गोलंदाजांसाठी ते थोडे सोपे होते,  असे महेंद्रसिंग धोनी म्हणाला.

त्यामुळे कर्णधार बदलल्याने फारसा बदल होत नाही. लक्ष्य मोठे होते, त्यामुळे चांगल्या गोलंदाजीची गरज होती. आमच्या फिरकीपटूंनी पॉवर प्लेनंतर आवश्यक असणारी धावगती वाढवण्याचे उत्तम काम केले. ही विजयाची गुरुकिल्ली होती. कारण समोरच्या संघाने २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली, पण आमच्या फिरकीपटूंनी त्यांना रोखले, असे धोनी म्हणाला.

RELATED ARTICLES

Most Popular