25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeLifestyleखाण्यापूर्वी आंबे पाण्यात का भिजवतात ! जाणून घेऊया कारण

खाण्यापूर्वी आंबे पाण्यात का भिजवतात ! जाणून घेऊया कारण

बऱ्याचदा आंबा खाण्याच्या मोहापाई यामागचं कारण कधी लक्षातच घेतलं गेल नाही.

सध्या आंब्याचा मोसम सुरु झाला आहे. बाजारामध्ये विविध प्रकारचे आंबे मिळू लागले आहेत. लहान मुले, मोठी असोत वा वृद्ध, सर्वच पिकलेले आंबे आवडीने आणि चवीचवीने खातात. काही लोकांना आंबा कापून खायला आवडतो,  तर काहींना आंबा बाटीसकट चोखून खायला आवडतो. पण बर्याचदा आपण घरामध्ये पाहतो कि, आंबा खाण्यापूर्वी घरातील जेष्ठ महिला अनेकदा आंबे थोडा वेळ पाण्यात भिजत घालतात. बऱ्याचदा आंबा खाण्याच्या मोहापाई यामागचं कारण कधी लक्षातच घेतलं गेल नाही. आंबे खाण्यापूर्वी भिजवण्यामागे, काही पौष्टिक तसेच आयुर्वेदिक देखील कारणे आहेत.

आंब्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये असलेले घटक पचनक्रिया सुधारतात, आतड्यांचे आरोग्यही त्यामुळे सुधारते. आंब्यामध्ये फायटिक ऍसिड नावाचा नैसर्गिक रेणू असतो, जो अनेक सुख्या मेव्यांमध्ये देखील असतो. आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ऍसिड बाहेर पडण्यास मदत होते. आंबा न भिजवता खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊ शकते.

आंबा हे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. आंब्यामध्ये भरपूर पोषक असतात. आंबा डोळे, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आंब्याचे सर्व फायदे मिळविण्यासाठी, तो खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवणे आवश्यक आहे. आंबा पाण्यात भिजवल्याने आयुर्वेदिक फायदे मिळतात.

आंब्याची साल देखील गरम असते. त्यामुळे अनेकदा आंब्याची साल खावू नये असे घरातील जेष्ठ सांगत असतात. कारण आंब्याच्या सालीमुळे शरीरात उष्णता निर्माण होते. आंबा जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रामुख्याने पित्त प्रकृतीच्या लोकांना आंबा खाल्ल्याने चिडचिडेपणा, तणाव, चेहऱ्यावर मुरुम येणे अशी लक्षणे जाणवू शकतात. हे अपाय टाळण्यासाठी आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवावेत.

RELATED ARTICLES

Most Popular