28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...
HomeEntertainmentनाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

या चित्रपटाच्या प्रोमेमधील काही दृष्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप नोंदविला आहे

महेश मांजरेकर यांचा प्रत्येक चित्रपटाचा विषय कायमच वेगळा असतो. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” हा चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. परंतू या ट्रेलरमध्ये दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटा विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरुन हटवण्यात आला आहे. आता या सर्व वादावर महेश मांजरेकांनी अखेर प्रतिक्रिया देत सर्व आक्षेपार्ह दृष्ये ट्रेलर आणि चित्रपटातून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. आणि याबाबत त्यांनी एक निवेदन देखील जाहीर केले आहे.

महेश मांजरेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले, ‘या चित्रपटाच्या प्रोमेमधील काही दृष्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप नोंदविला आहे, परंतु, कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. समाजातून उमटणाऱ्या भावनांचा आम्ही मान राखत या चित्रपटाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी सर्व दृष्ये काढून टाकण्यात आली आहेत.

तसेच हा प्रोमो सर्व ठिकाणांवरून काढण्यात आला असून सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात आला आहे.’ आज १४ जानेवारीला ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कोणताही मनात आकस न ठेवता, “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” या चित्रपटाचा आनंद घ्यावा. एक वस्तुस्थिती आणि तितकाच नाजूक विषय या चित्रपटाच्या माध्यमातून हाताळण्यात आला आहे. मुंबई मध्ये काही दशकांपूर्वी उद्भवलेली परिस्थिती या चित्रपटाद्वारे दाखविण्यात आली आहे. त्यामुळे १८ वर्षाच्या वरील सर्वांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पहावा असे लेखी आवाहन महेश मांजरेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular