24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriजनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी लाभार्थ्यांचे कार्ड तयार करून देण्यासाठी पाठपुरावा करावा.

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व वय वंदना कार्ड योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, या योजनेत सहभागी होण्यासाठी https://beneficiary. nhea.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून आयुष्यमान कार्ड तयार करता येते.

सर्व आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी लाभार्थ्यांचे कार्ड तयार करून देण्यासाठी पाठपुरावा करावा. या मोहिमेमध्ये आपले सरकार सेवाकेंद्र, आशासेविका, स्वस्त धान्य दुकानचालक, आरोग्यमित्र, सरपंच, ग्रामपातळीवरील शासकीय अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ, स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा. या योजनेचे लाभ कुटुंबआधारित असल्याने ई-केवायसी करण्यासाठी रेशनकार्डची व आधारकार्डची माहिती वापरली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी रेशनकार्ड ई-केवायसी करून घ्यावे, असा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

असा मिळतो लाभ – एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १ हजार ३५६ उपचार व शस्त्रक्रियेसाठी प्रतिकुटुंब प्रतिवर्ष रुपये ५ लाख संरक्षण व २ हजार ३०० पेक्षा जास्त शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात.

RELATED ARTICLES

Most Popular