28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriरत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा - बाळ माने

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

शहरातील रस्त्यांची गेल्या महिन्यापासून दुरवस्था झाली आहे.

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे. प्रत्येक प्रभागासाठी नियोजन करणार आहोत. खराब रस्ते, अपुरी पाणीयोजना व शहर विकासाचे वाटोळे करणाऱ्या यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला पाहिजे. रत्नागिरी शहर आदर्श होण्यासाठी वेळ आली की, मतदारांना रोडमॅप सादर करू, असे प्रतिपादन भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केले. खड्ड्यांकरिता आंदोलन केल्यानंतर माने यांनी संवाद साधला. माने म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी पालिकेचा जो कारभार बिघडवला आहे त्यांना एकदा घरी बसवा. दोन तृतीयांश सत्ता भाजपला द्या. भाजपचा नगराध्यक्ष व नगरसेवक रत्नागिरी आदर्श शहर म्हणून प्रयत्न करतील. नागरिकांनी साथ द्यावी. शहरातील रस्त्यांची गेल्या महिन्यापासून दुरवस्था झाली आहे.

खराब रस्त्यांच्या कामांच्या दर्जाची चौकशी होणे आवश्यक आहे. पालिकेला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुख्य रस्ता, उपरस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे; अन्यथा भाजपतर्फे तात्पुरती दुरुस्ती करू. शहरात डेंगी, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आरोग्यव्यवस्था सक्षम नाही. शहराचा सगळा भार जिल्हा रुग्णालयावर येतोय. डॉक्टर, कर्मचारी नसल्याने रुग्णांना दुसरीकडे न्यावे लागत आहे. फवारणी करणे आवश्यक होते. अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य विभागाने केले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनीही नगरपालिकेला वारंवार निवेदने दिली आहेत. आम्ही आजवर भाजपचे शांततापूर्ण प्रतिनिधीत्व केलं होते; पण आता भाजप आक्रमक भूमिका घेईल.

अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांमुळे पाणी योजना रेंगाळली – मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून ६४ कोटी रुपयांची नळ पाणी योजना २०१६ मध्ये रत्नागिरीसाठी मंजूर केली. राज्यस्तरीय नगरोत्थानमधून निधी दिला होता. भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर तसेच मिलिंद कीर यांनी या योजनेच्या निर्माणाकरिता चांगले प्रयत्न केले होते. ती योजना दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही. दोन वर्षांत ही योजना पूर्ण व्हायला हवी होती. या योजनेसाठी पालिकेला अल्टिमेटम दिला आहे की डिसेंबरच्या आत २४ तास पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular