25.8 C
Ratnagiri
Wednesday, November 26, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSportsऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास

ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास

भारताने इतिहास रचत ४१ वर्षानंतर टोकियोतील एस्ट्रो टर्फवर पुरुष हॉकीमध्ये कांस्य पदक मिळवले आहे. भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने ५-४ असा विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट खेळीने पदक भारताकडे खेचून आणले आहे. पण संघातील ९ खेळाडूंनी केलेले २३ गोल भारतीय प्रेक्षक कधीच विसरु शकत नाही. १९८० साली मास्को ऑलिम्पिकनंतर भारताने पहिल्यांदाच हॉकीमध्ये पदक मिळवलं आहे, त्यामुळे करोडो भारतीयांनी वेगवेगळ्या तर्हेने आनंद साजरा केला आहे.

टोकियो ओलिम्पिकमध्ये भारताकडून गोल करण्यात सर्वात मोठं योगदान ठरलं असेल ते हरमनप्रीत सिंगचे. स्पर्धेतील सर्वाधिक गोल त्याच्या नावे आहेत. एकूण केल्या गेलेल्या २३ गोलमधील ६ गोल हरमनप्रीतच्या नावे आहेत. हरमनप्रीतच्या पाठोपाठ रूपिंदर पाल सिंगने ज्याची ओळख भारताचा ड्रॅग फ्लिक स्पेशलिस्ट अशी आहे,  त्यानेही स्पर्धेत ४  गोल केले आहेत. संपूर्ण टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने केलेल २३ गोलच विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. या २३ गोलमधील १३ गोल हे  ग्रुप स्टेजमधील ५ सामन्यात ठोकले. त्याच्या जोरावरच ५ पैकी ४ सामने भारताने जिंकले. ज्यानंतर नॉकआउट स्टेजमध्ये भारताने १० गोल करण्यात आले, भारताकडून हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक गोल केले. या स्पर्धेत तिसऱ्या नंबरवर सिमरन जीत असून त्याने ३ गोल केले. आणि अनुक्रमाने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या नंबरवर दिलप्रीत, हार्दिक आणि गुरजंत यांनी प्रत्येकी २-२ गोल करत संघाला पदक जिकण्यासाठी योगदान दिलं. पुरुष हॉकीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल अनेक दिग्गजांनी संघाची पाठ थोपटली असून, पंजाब सरकारने संघातील हॉकी खेळाडूंना १ कोटीचं बक्षिस जाहीर केलं असल्याची माहिती  पंजाबचे क्रिडामंत्री राणा गुरमित सोडी यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष कर्णधाराला फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular