29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeSindhudurgमालवणमधील धामापूर तलाव इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानीत

मालवणमधील धामापूर तलाव इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानीत

तलाव संवर्धन झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर धामापूर आणि काळसे गावाची ओळख होऊ शकते.

ऐतिहासिक धामापूर तलाव १५३० मध्ये विजयनगर राजवटीच्या काळात बांधण्यात आले. या राजवटीच्या काळात अनेक तलाव, मंदिरे बांधण्यात आली. त्याची ठेवण धामापूर तलाव आणि परिसरातील मंदिर पाहिल्यावर लक्षात येते. धामापूर तलावात दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजातींसह समृद्ध जैवविविधता आहे. समृद्ध जैवविविधता, पर्यटन, निसर्गसौंदर्य, सिंचन, पाणीपुरवठा आणि मासेमारी या सर्व बाबतीत धामापूर तलाव एक आदर्श असे ठिकाण आहे. धामापूर तलावाची नोंद पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयने पाणथळ जागा म्हणून देशाच्या पाणथळ नकाशावर सुद्धा प्रसिद्ध केली आहे. आंतरराष्ट्रीय आणि उच्च दर्जाचे पर्यटक गावात यावेत, या उद्देशाने स्यमंतक संस्थेमार्फत गावात सोविनियर शॉप्स  तसेच हेरिटेज पर्यटनासाठी, कला-कौशल्यांसाठी मार्गदर्शन देण्यात येत आहे.

धामापूरचा तलाव धामापूर आणि काळसे गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. आता धामापूर तलावाला जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे उच्च दर्जाचे पर्यटन कसे वाढेल, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

युनेस्कोच्या धर्तीवर इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन ॲण्ड ड्रेनेजतर्फे दिला जाणारा ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट २०२०’ हा सन्मान तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक धामापूर तलावाला मिळाला आहे. संपूर्ण जगात अशा १२१ साईट्स आहेत. भारतामध्ये एकूण १० आहेत. पैकी महाराष्ट्र आणि गोवामधील एकमेव अशी नामांकित साईट धामापूर तलाव आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये धामापूर तलावावर तपशीलवार अभ्यास करून संपूर्ण अहवाल आयसीआयडीला स्यमंतक संस्था, धामापूर जीवन शिक्षण विद्यापीठ तर्फे सादर करण्यात आला होता.

यापुढे तलाव संवर्धन झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर धामापूर आणि काळसे गावाची ओळख होऊ शकते. त्यासाठी सुद्धा एका वेगळ्या आंतरराष्ट्रीय नामांकनाची तरतूद आहे, असे स्यमंतक संस्थेचे सचिन देसाई यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular