शिवसेना आणि भाजप मधील वाद आता उघड्यावर पडत आहे. अनेक जुनी नवी प्रकरणे उकरून बाहेर काढली जात आहेत. आणि त्यावर अगदी हीन दर्जावर जाऊन आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसून येत आहे. सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणी, त्याची मनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी केलेल्या संभ्रमित करणाऱ्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात तिच्या पालकांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात केलेल्या वक्तव्यामुळे नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे भाजपचे आमदार नितेश राणे यांना मालवणी पोलिस स्टेशनने चौकशीसाठी हजर रहाण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्याची नोटीस मालवणी पोलिसांनी बजावली आहे. तर नितेश राणे यांना ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे.
या दोघांच्या अटकेची नोटीस निघाल्यावर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक सूचक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी बाप बेट्याबरोबरच तीन वसुली एजंटही तुंरुगात जातील याचा पुनरुच्चार केला आहे. सोमैयांच्या संदर्भात हे ट्विट असल्याचे मानले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन आज पुन्हा शिवसेना झुकणार नाही असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन बाप बेट्याबरोबरच आणखी तीन केंद्रिय संस्थांमधील वसुली एजंटही तुरुंगात जातील असे म्हटले आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आधीच सांगितले होते, त्यानंतर आज त्यांनी पुन्हा या संदर्भात ट्विट केले आहे.