30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...

यंदा परीक्षा लवकर होणार १० वी, १२ वीच्या तारखा जाहीर

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी...

माजी मंत्री बच्चू कडूंचा निवडणूक आयोगासह ईव्हीएमवर हल्लाबोल

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू...
HomeRatnagiriबाणकोट हिम्मतगडावर किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक ठेवा

बाणकोट हिम्मतगडावर किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक ठेवा

कोकणाला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि त्या काळातील अनेक पुरातन वस्तू खात्याकडून अजूनही जतन करून ठेवल्या जातात. सध्या किल्ले संवर्धन हा विषय खूपच चर्चिला जात आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधण्यात आलेली तटबंदी आज इतक्या वर्षानंतरसुद्धा तसूभर ढासळलेली नाही आणि आजचे करण्यात येणारे रस्ते पुढचा पावसाळ्यापर्यंत पण टिकत नाहीत. किल्ले सफाई आणि संवर्धन त्याचप्रमाणे विविध किल्ल्यांची सविस्तर माहिती जगामध्ये प्रसिद्ध व्हावी यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे.

जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील हिम्मतगडावर किल्ले स्वच्छता मोहिमेदरम्यान लोखंडी तोफगोळा आणि लोखंडी कडी असा ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. या वस्तू बाणकोट ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आल्या असून, बाणकोट ग्रामपंचायतीकडून ही माहिती पुरातत्व विभागाला पुरविण्यात आली आहे.

या किल्ले स्वच्छता मोहिमेदरम्यान किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील देवडीमध्ये २ इंच लांबी रुंदी व साधारण १० इंच व्यास असलेला लोखंडी तोफगोळा आणि लोखंडी दरवाजाच्या गंज लागलेले कडी सापडली आहे. या वास्तूंची माहिती सहाय्यक संचालक विलास वाहने यांना देण्यात आली. त्यांनी सुचविल्या प्रमाणे सदर वस्तू या सध्या स्थानिक बाणकोट ग्रामपंचायत सरपंच हमीदा परकार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

पुरातन सापडलेल्या वस्तू या शासनाकडे सुपूर्द केल्या जात असून, अशा अनेक वस्तू पुरातत्व विभागाकडे संग्रहित आहेत. जेंव्हा या विभागाचे अधिकारी हे बाणकोट किल्ल्याला भेट द्यायला येतील, तेव्हा तोफगोळा व कडी स्वत:च्या ताब्यात घेतील,  अशी माहिती श्रीवर्धन विभाग अध्यक्ष योगेश निवाते आणि दापोली तालुका प्रशासक ललीतेश दवटे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular