32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeRatnagiriमंडणगड येथील संशयित संशयित कोरोना रुग्णाचा अखेर मृत्यू

मंडणगड येथील संशयित संशयित कोरोना रुग्णाचा अखेर मृत्यू

सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक पर्यटक विविध ठिकाणी फिरण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे संसर्गाची भिती अधिक पसरण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट मुळे चीन आणि लगतच्या इतर राष्ट्रांमध्ये उलथापालथ झाली असून, परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करत आहेत. परंतु, सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक पर्यटक विविध ठिकाणी फिरण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे संसर्गाची भिती अधिक पसरण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात काल एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंडणगड तालुक्यात पाल्ये गावतील एका रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्टमोडवर आहे. तुर्तासतरी कोणतीही चिंता करण्याच कारण नाही पण काळजी घेणे आवश्यक आहे. या संशयित रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आली आहे.

नव्या वर्षाचे स्वागतासाठी जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्हात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयात कोकणातील मोठे रुग्णालय असलेल्या चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड येथील संशयित कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान या संशयित कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा अखेर मृत्यू ओढावला आहे. त्याचा आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल आज रात्रीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. या संशयित कोरोना रुग्णाचा दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

या रुग्णाला पूर्वीपासून अस्थमाचा त्रास होता आणि गेल्या काल रात्रीपासून या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान या रुग्णाची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल उद्या रात्रीपर्यंत मिळण्याची शक्यता जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांनी वर्तवली आहे. दरम्यान, लोकांनी घाबरून जाऊ नये, जिल्ह्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट दाखल झाला आहे का, हे मात्र आरटीपीसीआर अहवालानंतर स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular