27.9 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriपेटलेल्या वणव्याचा मंडणगड किल्ल्याला वेढा, शेकडो एकर क्षेत्र जाळून खाक

पेटलेल्या वणव्याचा मंडणगड किल्ल्याला वेढा, शेकडो एकर क्षेत्र जाळून खाक

पायथ्याशी असणार्‍या शेतकर्‍यांच्या आंबा, काजूची झाडे, जंगली फळझाडे, रानमेवाची झाडे होरपळून गेली आहेत.    

निसर्गाचे अनमोल वरदान लाभलेला आणि जैवविविधतेने भरून राहिलेला मंडणगड किल्ला व सभोवतालचा परिसर वणव्यात जळून खाक झाला. मंगळवारी पेटलेल्या वणव्यात परिसरातील वनसंपदा नष्ट होवून निसर्गसंपन्न किल्ला वणव्यामध्ये काळवंडून काळाकुट्ट पडला आहे. दरवर्षी या परिसरात याच मोसमात वणवा कसा लागतो हे अद्यापही न उलगडलेले कोडे आहे.

स्थानिक म्हणतात कि, हा वणवा मानवनिर्मित असण्याची शक्यता आहे. मंगळवारी संध्याकाळी किल्ला आणि लगतच्या परिसरामध्ये आगीचे डोंब उसळले. बघता बघता वणवा पूर्ण मंडणगड किल्ल्याच्या भोवती पसरला. आणि त्यामध्ये सर्व जळून खाक झाले. त्याचप्रमाणे हा वणवा तुळशी, माहू, पाले, कोंझर परिसरामध्ये देखील पसरला. सुमारे सतरा तास हा वणवा भडकत राहिला होता. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्र जळून गेले. यामध्ये पायथ्याशी असणार्‍या शेतकर्‍यांच्या आंबा, काजूची झाडे, जंगली फळझाडे, रानमेवाची झाडे होरपळून गेली आहेत.

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत या परिसरात वणवा पेटतो. दुपारच्या सुमारास किल्ला परिसरात आगीचे डोंब दिसायला लागले आणि काही क्षणात वणव्याने किल्ल्याला वेढा घातला. हा वणवा अनेक तास भडकत होता. मंडणगड किल्याकडे शासन, प्रशासन व पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याने पर्यटन विकासाची गाडी केवळ शब्दांमध्येच अडकून पडली आहे.

अपुर्या सोयी सुविधा असल्याने तस म्हणायाला गेलं तर मंडणगड किल्ला दुर्लक्षितच राहिला आहे. सुविधाच योग्य प्रकारे नसल्याने पर्यटकांचा ओघ अद्याप सुरू झालेला नाही. नाहीतर एखाद्या वीकेंडला किल्यावर वस्ती करणे हा एक थ्रील्लिंग अनुभव आहे. परंतु, गरज आहे ती या किल्ल्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आणि आवश्यक सुविधा पुरविण्याची.

RELATED ARTICLES

Most Popular