25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहाथ

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहाथ

रत्नागिरी जिल्ह्यातील शासनाच्या नोंदणीकृत ठेकेदाराला मंडणगड तालुक्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती व प्रार्थमिक केंद्र अद्यावत करण्याचा ठेका मिळाला होता. मंडणगड तालुक्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीच्या कामाचे मूल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी शासनाच्या नोंदणीकृत ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खेड पंचायतीमध्ये शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कंत्राटी कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत गमरे याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे.

ठेकेदाराने आतापर्यंत केलेल्या कामाचे मूल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कंत्राटी अभियंता चंद्रकांत गमरे याने ठेकेदाराकडे कामाच्या एकूण रकमेच्या दोन टक्के म्हणजे ६० हजार रुपयांची मागणी केली होती.

ठेकेदार यांनी या प्रकरणाबाबत चंद्रकांत गमरे यांचे विरुध्द लाचलुचपत खाते रत्नागिरी यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भरणे नाका परिसरात त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. या ठिकाणी ठेकेदार यांच्याकडून ५० हजार रुपयांची लाच घेत असतानाच सापळा रचलेल्या अधिकाऱ्यांनी गमरे याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रविण ताटे, सपोनी संदीप ओगले, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावाकर यांच्या पथकाने केली. खेड पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी सुशांत चव्हाण यांनी पदभार स्वीकारतानाच सर्व जनतेला आवाहन केले होते कि, कोणताही शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्याचे वतीने खाजगी इसम पैशाची मागणी करत असेल, तर न घाबरता कृपया लाचलुचपत विभाग रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

Most Popular