28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraगावठी हातबॉम्ब हाताळताना एकाचा जागीच मृत्यू

गावठी हातबॉम्ब हाताळताना एकाचा जागीच मृत्यू

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये निजामपुरजवळ गावठी हातबॉम्ब हाताळीत असताना एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये दहा वर्षाचा मुलगा आणि एक महिला देखील गंभीर जखमी झाला आहे. माणगावमधील मशीदवाडी गावाच्या माळरानामध्ये चव्हाण हे मजुरी करणारे कुटूंब राहते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संदेश चव्हाण हा हातबॉम्ब हाताळीत असताना अचानक त्याचा स्फोट घडून आला. यामध्ये संदेशचा जागीच मृत्यु झाला. तर दहा वर्षांच्या मुलाला गंभीर जखमी झाला आहे. तर संदेश चव्हाणची पत्नी माजीनाबाई हीला किरकोळ दुखापत झाली आहे.

माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरीता गंभीर दुखापत झालेल्या मुलाला त्वरीत दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांकरिता एमजीएम पनवेल येथे हलविण्यात आले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, माणगाव तालुका उप  विभागीय पोलिस अधिकारी प्रविण पाटील पोलिस निरिक्षक अश्वनाथ खेडेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी माणगाव उप जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या परिसराची पाहणी केल्यानंतर पोलिसांना एका झाडावर लपवुन ठेवण्यात आलेले २५ गावठी हातम्बॉब सापडले.

या ठिकाणी राहात असलेले चव्हाण कुटूंब मध्यप्रदेशांतील पारधी समाजांतील असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.  या घटनेची नोद माणगाव पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असुन भादवी २८६, ३३७,३३८ स्फोटक कायदा कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकचा तपास माणगाव पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular