27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriऐन पावसाळ्यात आंबा कलमांना मोहोर - बागायतदार चिंतेत

ऐन पावसाळ्यात आंबा कलमांना मोहोर – बागायतदार चिंतेत

पावसाळा सुरू असतानाच मोहोर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वातावरण सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम निसर्गातही पाहायला मिळत आहे. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला असतानाच रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे आंबा कलमांना ऑगस्टमध्ये मोहोर आल्याने बागायतदार चिंतेत पडले आहेत. भविष्यात यापासून उत्पन्न मिळणार का, अशा विवंचनेत बागायतदार पडले आहेत. पावस परिसरातील कुर्धे परिसरातील अभिजित डोंगरे यांच्या १२ ते १३ कलमांना मोहोर आला आहे. आता आलेला मोहोर टिकण्याची शक्यता कमी असल्याने थंडीच्या कालावधीत पुन्हा मोहोर येणार की नाही, अशी भीती बागायतदारांना पडली आहे.

जून ते सप्टेंबर यादरम्यान पाऊस असतो. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान हापूस कलमांना नवीन पालवी फुटून मोहरे येतो. फेब्रुवारी महिन्यापासून एप्रिल ते मे दरम्यान हापूस आंबा बाजारात येण्यास सुरवात होते. एप्रिल, मे मध्येच हापूस आंब्याचे आगमन होत असेल प्रामुख्याने गुढीपाडव्यानंतर मुहूर्त केला जायचा, परंतु सध्या मोठ्या प्रमाणात आंबा बागेमध्ये होणाऱ्या फवारण्या कल्टारचा वापरामुळे काही ठिकाणी फेब्रुवारीपासूनच आंब्याचे उत्पादन येण्यास सुरवात झाली आहे; परंतु पावसाळ्यात कलमांना मोहोर येण्याची घटना घडली नव्हती. त्यामुळे पावसाळा सुरू असतानाच मोहोर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular