जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर अपवादात्मकरित्या वाढलेला असून मागील आठवड्यापासून तापमान सातत्याने ६ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवण्यात आले आहे. आणखी काही दिवस थंडीची स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर दापोलीतील वातावरण पुन्हा उबदार होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. मात्र यामुळे आंब्याचा फुटवा फुटायला विलंब होणार आहे. ही परिस्थिती केवळ दापोली तालुक्यात असल्याने ज्या ठिकाणी थंडीचा जोर कायम राहिल तेथे आंबा उशिरा येण्याचा धोका आहे. दरम्यान, दापोली व आसपासच्या भागात आंबा उत्पादकांचे लक्ष आता पूर्णपणे तापमानातील या चढउतारावर केंद्रीत झाले आहे. कारण, आंबा पिकाच्या वाढीतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे फुटवा हा तापमानाशी निगडित असतो. सामान्यतः फुटव्यासाठी १३ अंशच्या आसपासचे तापमान सर्वात अनुकूल मानले जाते. या तापमानात कळ्या व्यवस्थित फ टतात.
कोकणातील दापोली, हर्णे, लाडघर, मुरुड, कर्दे, केळशी अशा किनारपट्टीला लागून असलेल्या गावांमध्ये जानेवारीतच आंब्यांना फुटवा दिसू लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे समुद्राजवळील भागात तापम ानात मोठे चढउतार नसतात, दिवस-रात्रीच्या तापमानात साधारण ८ ते १० अंश सेल्सिअस एवढाच फरक असतो. किमान तापमान सहसा १३ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान असते. याम ळे समुद्रकिनारी भागात आंबा पिकाचा विकास नियमित आणि लवकर होतो. येथील समुद्रसपाटीपासून साधारण २०० ते २५० मीटर उंचीवर असल्याने येथे तापमानात मोठी घट दिसून येते. डिसेंबर-जानेवारीत दापोलीतील किमान तापमान बहुधा फ ८-१० अंश सेल्सिअस पर्यंत खाली येते. इतिहासातील तापमान नोंदी पाहिल्यास दापोलीतील जानेवारी-फेब्रुवारीच्या तापमानात लक्षणीय घसरण झाल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानाची आकडेवारी स्पष्ट करते की दापोलीतील आंबा पिकाला अनुकूल असलेले १३ अंश सेल्सिअसचे फुटवा अनुकूल तापमान येथे क्वचितच टिकते.
सध्याच्या परिस्थितीचा आंबा पिकावर परिणाम या वर्षीही तापमान ६-१० अंश सेल्सिअच्या खाली नोंदले जात असल्याने आंबा उत्पादक चिंतेत आहेत. तापमान १३ अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहिल्यास आंब्याला फुटवा येत नाही किंवा खूप उशिरा येतो. फुटवा उशिरा आल्यास फळधारणा मार्च-एप्रिलपर्यंत पुढे जाते. त्यामुळे बाजारात माल उशिरा पोहोचतो आणि हंगामाचा कालावधी कमी होतो. तज्ज्ञांच्या मते, थंडीचा जोर असाच कायम् राहिला तर दापोलीमध्ये आंब्याचे पीक यंदाही उशिराच येण्याची शक्यता आहे. आंब्याच्या गुणवत्तेसाठी थंडी फायदेशीर असली तरी अति कमी तापमान दीर्घकाळ टिकल्यास उत्पादनावर परिणाम होणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

