कोकणामध्ये प्रत्येक सणासुदाला कोकण रेल्वे आपल्या विशेष गाड्या सोडण्याची व्यवस्था आकरण्यात येते. मागील महिन्यातच पार पडलेली आंगणेवाडीसाठी यात्रा, त्यास जगभरातून अनेक पर्यटक दाखल होतात. त्यामुळे पर्यटकांची रेलचेल या मोसमामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये असते आणि त्यासाठी पर्यटकांसाठी रेल्वेची सुविधा तसेच आता आंब्याचा मोसम असल्याने विविध भागांना जोडण्यासाठी विशेष रेल्वेची सोय करण्याची मागणी करण्यात येत असते.
कोकणातील हापूस आंबा, खान्देशातील केळी, विदर्भातील संत्री, पेण येथील पापड, लोणची, औषधी पांढरा कांदा, विविध उद्योग, बाजारपेठ वाढीसाठी नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव सुपरफास्ट सुरू करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे केली. रायगड जिल्ह्यातील माणगाव, श्रीवर्धन, रोहा, पोलादपूर, महाड, गोरेगाव, इंदापूर, कोलाड, नागोठणे, पेण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली तर सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, देवगड हि महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत. कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणारी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमणात आहे. नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव सुपरफास्ट स्पेशल सुरू करण्याची कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर, जनसंपर्क प्रमुख तथा तालुकाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री वैभव बहुतूले, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजकुमार व्यास, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ओमकार उमाजी माळगांवकर, प्रवासी संघटना अध्यक्ष शेखर नागपाल, पेण संपर्कप्रमुख हर्षद भगत, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, अकोला प्रवासी सुधीर राठोड, जळगाव येथील दिपक सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे सुरू करण्याची मागणी केली आहे.