26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeMaharashtra...... तर मी स्वत: राजकीय निवृत्ती घेण्यास तयार आहे

…… तर मी स्वत: राजकीय निवृत्ती घेण्यास तयार आहे

अभ्यास न करता विधानसभेत एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचाराचा आरोप केला, हे सांगण्याचं धाडस करणाऱ्याला सलाम केलं पाहीजे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दारू बनवणार्‍या एका कंपनीला मेगा प्रोजेक्टचा दर्जा देण्यासाठी कंपनीची २ जिल्ह्यांतील गुंतवणूक एकत्र दाखवली. तसेच, या कंपनीला सुमारे २१० कोटी रुपयांची सबसिडीदेखील दिल्याचा आरोप आहे. याबाबतीत उदय सामंत यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे.

ते म्हणाले, श्रीरामपूर आणि चिपळूणची इंडस्ट्री एकत्र करण्यात आली आणि २०० कोटींचा इन्सेंन्टिव्ह दिला असा फार मोठा शोध एका विद्वानाने लावला. खोट्या प्रकारचे आरोप करून नक्की काय साध्य होणार आहे. आमच्या विरोधातले खोटे पुरावे समोरच्यांकडे द्यायचे आणि त्यांना खोटं बोलायला लावायचं. तसेच त्यांनाच उघडं पाडायचं. हे कोणतरी विरोधकांच्या बाबतीत फार मोठं षडयंत्र रचत आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. अभ्यास न करता विधानसभेत एखाद्या मंत्र्याने भ्रष्टाचाराचा आरोप केला, हे सांगण्याचं धाडस करणाऱ्याला सलाम केलं पाहीजे. एखादी गोष्ट कशा पद्धतीने दाबून आणि रेटून सांगायची. पण यामध्ये जर पुरस्कार द्यायचा असेल तर आमच्या सहकाऱ्यांना देणं उचित ठरणार आहे, असं उदय सामंत म्हणाले.

माझ्या हातात जो कागद आहे, तो कागद मी कुणालाही दिलेला नाहीये. मला त्यांना आवाहन करायचं की, मागील अडीच वर्षातील उद्योग मंत्र्यांनी असा कॅबिनेट सब बैठकीचा निर्णय घेतला का?, हा जाहीर केला पाहीजे. तो इन्सेंन्टिव्ह किती हजार कोटींचा द्यायचा मान्य केला आहे. तो आधी जाहीर केला पाहीजे. जो निर्णय आम्ही दोन दिवसांपूर्वी घेतला त्याचा एक रुपयाही जास्त गेला असेल तर मी स्वत: राजकीय निवृत्ती घेण्यास तयार आहे. मी एक पैशाचाही इन्सेंन्टिव्ह घेतलेला नाही. फक्त धोरण म्हणून मी हा निर्णय घेतला होता. आज माझ्याकडे जो आकडा आहे. अशा माझ्या ऑफिसमध्ये २५० फाईल्स पडून आहेत, तसेच कॅबिनेट सब कमिटी शिंदे-फडणवीस सरकार येण्याआधी १८ महिने झाली नव्हती. १८ महिन्यानंतर कॅबिनेट सब कमिटी झाली, असं उदय सामंत म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular