31.4 C
Ratnagiri
Monday, March 17, 2025

दोन्ही समाजातील प्रतिनिधींची घेतली बैठक – आ. किरण सामंत

राजापूर शहरासह राजापूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या...

काँग्रेसची जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपड…

जिल्ह्यावर १९७२ पासून अगदी १९९० पर्यंत काँग्रेस...

तीन वर्षांत मलेरियाचा एकही रुग्ण नाही…

जिल्ह्यातील १ हजार ३०३ गावे कीटकजन्य आजारमुक्त...
HomeRatnagiriसंगमेश्वरचे ग्रामीण रूग्णालयात अनेक पदे रिक्त...

संगमेश्वरचे ग्रामीण रूग्णालयात अनेक पदे रिक्त…

९५ गावातील ग्रामस्थांना या रूग्णातपाचा महत्वाचा आधार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर कसबा नजिक ग्रामीण रूग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. मात्र गेली अनेक वर्षे या ट्रामा केअर सेंटरमधील महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी या महत्वाच्या पदांसह तब्बल १२ पदे रिक्त पदां अभावी रूग्णसेवाच आजारी पडली आहे. संगमेश्वर परिसरातील सुमारे ९५ गावातील ग्रामस्थांना या रूग्णातपाचा महत्वाचा आधार आहे तर आरवती ते बावनदी या ४० किलोमीटरच्या अपघातप्रवण क्षेत्रात अपघातग्रस्तांवर तातडीचे उपचार व्हावेत या करिता या अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. महत्वाच्या वैद्यकीय आणि अधिकारी तसेच पदे रिक्त असल्यामुळे काही वेळा येथील सोनोग्राफी मशिनरी पडून आहे. ग्रामीण रूग्णालयात प्रामस्थांसाठी आधार ठरत असूनही, अस्थाई स्वरूपाच्या पदांव्यतिरिक्त कायमस्वरूपी डॉक्टरांची भरती करण्यात आलेली नाही.

RELATED ARTICLES

Most Popular