26.8 C
Ratnagiri
Saturday, December 9, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeEntertainmentलाल दिवा आणि घुंगरांच्या आवाजाच्या गुंतवणूकीची कहाणी, चंद्रमुखी

लाल दिवा आणि घुंगरांच्या आवाजाच्या गुंतवणूकीची कहाणी, चंद्रमुखी

तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला धुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टी मध्ये सुद्धा एका पेक्षा एक दर्जेदार सिनेमांची रेलचेल सुरु आहे. प्रत्यक्ष आणि खऱ्या विषयावर आधारित विषय मांडण्याचा सध्या ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे अशा सिनेमाना प्रसिद्धी आणि यश सुद्धा चांगल्याप्रकारे मिळते. राजकारणात लोणच्याप्रमाणे मुरलेला नेता खास. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या चंद्रावर ही प्रेमकहाणी दाखवलेली आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला धुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखीचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ही पाठमोरी बसून शृंगार करणारी ‘चंद्रमुखी’ दिसत होती. त्यानंतर चित्रपटाचा आणखी एक टीझर समोर आला होता. त्यात खासदार दौलत देशमाने ही व्यक्तिरेखा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आदिनाथ कोठारे साकारत असल्याचे उघड करण्यात आले होते. दिग्दर्शक प्रसाद ओकने या चित्रपटाचा टीझर शेअर करत, ‘भारदस्त आवाज, करारी नजर, नेता ध्येय धुरंधर पण मनात उफाळलेला अखंड कलेचा सागर. खा. दौलत देशमानेंच्या दमदार भूमिकेत आदिनाथ कोठारे, असे कॅप्शन दिले आहे.

या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय–अतुल या दमदार जोडीने चंद्रमुखीला संगीत दिले आहे. हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कच्चा लिंबू आणि हिरकणीनंतर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक चंद्रमुखी हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या आवाजाची गुंतवणूक कशी होते, याची राजकीय प्रेमकहाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,  असा विश्वास निर्माता-दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटातील चंद्रमुखी ही मुख्य व्यक्तिरेखा कोण साकारणार याबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता ताणून धरली आहे. अखेर यावरुन आज पडदा उचलण्यात आला आहे. ही भूमिका मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे.

डोळे दिपवून टाकणाऱ्या भव्य सोहळ्यात ३५ फुटाच्या ‘चंद्रा’च्या फोटोचे अनावरण अभिनेता आदिनाथ कोठारे याच्या मार्फत करण्यात आले. या चित्रपटात आदिनाथ खासदार दौलत देशमाने ही व्यक्तिरेखा साकारतोय. यावेळी अमृतावर चित्रित करण्यात आलेले ‘चंद्रा’  हे शीर्षक गीतही सादर करण्यात आले. श्रेया घोषाल हिने या गाण्याला स्वरबध्द केले असून गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांनी दिले आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी चंद्राने आपल्या बहारदार लावणीने उपस्थितांची मने जिंकली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular