29.9 C
Ratnagiri
Wednesday, March 12, 2025

देवरहाटीच्या जमिनी परत करा ! रत्नागिरीमध्ये घंटानाद आंदोलन

देवरहाटीच्या जमिनी शासनाने हस्तगत केल्या आहेत. त्या...

छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक व्हावे – प्रमोद जठार

संभाजी महाराजांनी ११ मार्च १६८९ मध्ये बलिदान...

दापोलीमधील वाहतुकीची गती मंदावली…

येथील एसटी बसस्थानक ते बुरोंडीनाका या परिसरातील...
HomeRatnagiriकै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात 8 ते 12 मार्च कृषी महोत्सव...

कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात 8 ते 12 मार्च कृषी महोत्सव…

सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने भव्य-दिव्य असे कृषी प्रदर्शन यशस्वी करावे.

कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात 8 ते 12 मार्च असे 5 दिवस कृषी प्रदर्शन होणार आहे. यामध्येच पशु-पक्षी प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. आत्मा, कृषी, बँकर्स, जि प कृषी-पशुसंवर्धन, जिल्हा नियोजन अशा सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने भव्य-दिव्य असे कृषी प्रदर्शन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषी प्रदर्शनाच्या पूर्व तयारीबाबत आज बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतिवार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सूचित वंजारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, कृषी विद्यापीठ, बँकर्स, जिल्हा परिषद, कृषी विभाग, एनआरएलएम या सर्वांनी आपापले स्टॉल उभारुन योजनांची माहिती द्यावी. शेतकरी, उत्पादक, महिला बचत गट यांच्यासाठी माहितीप्रदान परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावेत. 8 मार्च महिला दिनानिमित्त विशेष स्पर्धात्मक कार्यक्रम घ्यावेत. प्रदर्शनाच्या सुरुवातीला प्रवेशद्वारावर क्युआर कोडच्या माध्यमातून माहिती प्रदर्शित करावी. श्री. सदाफुले आणि श्री. बेतिवार यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular