26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeBhaktiमार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं पूजाव्रताची पद्धत

मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं पूजाव्रताची पद्धत

यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात आणि या महिन्यात केले जाणारे महालक्ष्मी व्रत हे दोन्ही एकाच दिवशी म्हणजे आज २४ नोव्हेंबर रोजी आले आहे.

आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. हिंदू धर्मियांसाठी मार्गशीर्ष महिना पवित्र महिन्यांपैकी एक आहे. घरात सुख शांती, समाधान लाभावं यासाठी ४ ते ५ गुरुवारी हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक स्त्रिया लक्ष्मीच्या व्रताची पूजा करतात. या महिन्यात स्त्रिया मांसाहार करत नाहीत. लक्ष्मी व्रताची दर गुरुवारी पूजा करून देवीची आराधना करतात. मनोकामना पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीला साद घालतात. यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात आणि या महिन्यात केले जाणारे महालक्ष्मी व्रत हे दोन्ही एकाच दिवशी म्हणजे आज २४ नोव्हेंबर रोजी आले आहे. महालक्ष्मीचं पूजाव्रत करण्याची पद्धत जाणून घेऊ.

पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारही बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे. त्यावर हळद-कुंकू वाहावे. पाण्याच्या तांब्यात दूर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा. कलशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे.

तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा. कलश चक्राकारावर ठेवावा. समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. लक्ष्मीसमोर दिवा लावावा. लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी. फळं, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा. देवीला कमळाचे फूल अर्पित करावे. लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी. श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. व्रत कथा वाचावी. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी.

संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे. गायीसाठी एक पान वेगळं काढावे. नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे. दुसर्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्या झाडाला घालावे.

पाने घरातील चहू बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे. शेवटच्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करावा.

RELATED ARTICLES

Most Popular