25.2 C
Ratnagiri
Friday, February 21, 2025

राजकोटजवळ ‘शिवसृष्टी ही उभारणार – मंत्री नीतेश राणे

किल्ले राजकोट येथे आज छत्रपती शिवाजी महाराज...

यावर्षी मुबलक हापूस उशिराने बाजारपेठेत – बागायतदारांना चिंता

बदलते हवामान आणि श्रीप्सचा प्रादुर्भाव यामुळे आंबा...

जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी – २०६ शाळांची यादी

जिल्हा परिषद ग्रामीण भागातील २०६ प्राथमिक शाळांच्या...
HomeRatnagiriमालगुंडात झेंडू फुले शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन

मालगुंडात झेंडू फुले शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन

यावर्षी अडीच ते तीन टन झेंडू उत्पादन अपेक्षित असल्याचे नितीन यांनी सांगितले.

वन्यप्राण्यांचा उपद्रव, नदीचे पाणी शिरून होणारे नुकसान यामुळे अनेक शेतकरी शेती न करता जमीन ओसाड ठेवू लागले आहेत; परंतु शेतीची आवड असलेले मालगुंड येथील नितीन अभ्यंकर यांनी जमीन पडिक न ठेवता १६ गुंठे क्षेत्रांवर झेंडूचे उत्पादन घेतले आहे. दसऱ्यासाठी झेंडू तयार झाला आहे. खरिपात भात लागवडीला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. मात्र, बदलत्या हवामानामुळे भातशेती खर्चिक झाली असून, अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अन्य उत्पादनांकडे वळू लागला आहे. नितीन हे गेली तीन वर्षे झेंडू लागवडीमधून उत्पन्न चांगले मिळवत आहेत.

नितीन यांनी झेंडू लागवडीसाठी पन्हाळा येथील नर्सरीतून रोपे आणली. त्यांनी केशरी व पिवळ्या दोन्ही रंगाच्या कलकत्ता मारीगोल्ड या वाणाची रोपं लावली आहेत. जमिनीची नांगरणी करून वाफे तयार करून त्यावर प्लास्टिक मल्चिंग पेपरचे आच्छादन केले. मल्चिंगमुळे तण उगवत नसल्याने तण काढणीच्या खर्चाची बचत होते. लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांत झेंडू काढणी योग्य होतो. गणपतीपुळे, मालगुंड, जाकादेवी तसेच रत्नागिरीत झेंडू विक्री करीत आहेत. यावर्षी अडीच ते तीन टन झेंडू उत्पादन अपेक्षित असल्याचे नितीन यांनी सांगितले.

योग्य नियोजनामुळे लक्ष्मी पूजनापर्यंत झेंडू विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर मात्र मिरची व भाजी लागवड करण्यात येणार आहे. पिवळा, केशरी रंगाचा झेंडू तयार झाला असून, नवरात्रोत्सवात किमान शंभर किलो विक्री अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांनी जाकादेवी येथे विक्री केंद्र सुरू करण्याचे निश्चित केले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे ३०० किलो झेंडू कुजला. मात्र, त्यामुळे निराश न होता पुढील उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. खत, पाणी व योग्य व्यवस्थापनामुळे शिवारात झेंडू बहरला असल्याचे नितीन यांनी सांगितले.

मिरची, कोबी, फ्लॉवरमधून उत्पन्न – झेंडू काढणीनंतर मिरची, कोबी, फ्लॉवर लागवड करण्यात येते. गतवर्षी ३५० ते ४०० किलो कोबीचे उत्पादन मिळाले होते. लाल मातीत फ्लॉवरही चांगला होतो. हिरव्या मिरचीलाही चांगली मागणी असल्याने ‘सीतारा गोल्ड’ या वाणाची निवड ते करीत आहेत. नर्सरीतून रोपे आणून लागवड करीत आहेत. ८० ते ८५ दिवसांत मिरची उत्पादन सुरू होते. मिरचीला दरही चांगला मिळत असल्याचे नितीन यांनी सांगितले. कोकणच्या लाल मातीतही पोषक गुणधर्म आहेत. त्यामुळे पिके चांगली येतात, शिवाय उत्पादनाचा दर्जाही चांगला असतो. मात्र, त्यासाठी नियोजन व कष्ट करण्याची तयारी आवश्यक आहे. आधुनिक तंत्राचा वापर केला तर खर्चही कमी होतो. नितीन यांनी अभ्यासपूर्वक झेंडू, मिरची लागवड करत आहेत. कोबी, फ्लॉवरचीही लागवड करीत असल्याने चांगले अर्थार्जन होत असल्याने त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular