26.3 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeMaharashtraमॅरी मी उत्कर्षा, कोल्हापूरकराची अनोखी लग्नासाठी मागणी

मॅरी मी उत्कर्षा, कोल्हापूरकराची अनोखी लग्नासाठी मागणी

लग्नासाठी मागणी घालण्याचा एक नवीन फंडा कोल्हापूरच्या सौरभ कसबेकरने शोधून काढला आहे. त्याचे व्हिडियो आणि फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत.

प्रेमामध्ये माणूस काय काय करू शकतो? याची अनेक उदाहरणे आपण पहात असतो. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण तरुणी विविध युनिक संकल्पना शोधत असतात. तसेच प्रेमाचे रुपांतर लग्नामध्ये होणे हे त्या खऱ्या प्रेमाचे प्रतिक ठरते. हल्ली लग्नाच्या सुद्धा विविध कल्पना राबवून लग्न सोहळे पार पाडले जातात. लग्नासाठी मागणी घालण्याचा एक नवीन फंडा कोल्हापूरच्या सौरभ कसबेकरने शोधून काढला आहे. त्याचे व्हिडियो आणि फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत.

लग्नासाठी असंही प्रपोज करता येतं, हे आज नव्यानं दिसून आलं. कोल्हापूर-सांगली मार्गावर चौकाजवळ लावलेल्या एका फलकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. मॅरी मी उत्कर्षा, असा मजकूर लिहित, सौरभ नावाच्या तरुणानं जाहीरपणे आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातलीये. विशेष म्हणजे या लव्ह स्टोरीचा सुखांत झाला असून, सौरभ आणि उत्कर्षाचं लग्न २७ मे रोजी होणार आहे.

कोल्हापूरचा सौरभ कसबेकर आणि सांगली जिल्ह्यातील बुधगावची उत्कर्षा या दोघांनी बुधगावच्या वसंतदादा पाटील टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर, सौरभला त्याच्या घरच्यांनी लग्नाबाबत विचारलं. तेव्हा सौरभला त्याची क्लासमेट उत्कर्षा डोळ्यासमोर आली.

सौरभच्या आई-वडिलांनी उत्कर्षाच्या आई-वडिलांना भेटून लग्नाबाबत बोलणी केली. पण उत्कर्षानं सुरुवातीला नकार दिला. अखेर दोन तीन महिन्यानंतर दोघांचे विचार जुळले आणि लग्नगाठीही जुळल्या. त्या आनंदात सौरभनं थेट सांगली-कोल्हापूर मार्गावर भलामोठा फलकावरून उत्कर्षाला लग्नाची मागणी घातली.

मॅरी मी उत्कर्षा,  शेवटी सौरभ असा मजकूर लिहिलेला हा फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. सोशल मीडियावरही तो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर सौरभ आणि उत्कर्षाने घडलेली सर्व कहाणी व्हीडीयोद्वारे सांगितली. आता २७ मे रोजी या दोघांचं लग्न होतं आहे. तेव्हा नांदा सौख्यभरे असं म्हणत समस्त कोल्हापूरकर त्यांना शुभेच्छा देत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular