24 C
Ratnagiri
Monday, September 8, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeMaharashtraशहीद जवान प्रशांत जाधव यांच्या गावामध्येही विधवा प्रथेला मुठमाती

शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या गावामध्येही विधवा प्रथेला मुठमाती

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे अनुकरण अनेक गावांमध्ये करण्यात येत आहे.

लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये खासगी बसला अपघात होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुकमधील प्रशांत शिवाजी जाधव यांना वीरमरण आले. प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी बसर्गेमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. अत्यंत शोकाकूल वातावरणात वीर जवानाला अंतिम निरोप देण्यात आला.

अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या अलोट जनसागराने पुष्पवृष्टी करत जाधव यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली. दरम्यान, शहीद प्रशांत जाधव आणि सातारचे शहीद सुभेदार विजय सर्जेराव शिंदे राज्य सरकारकडून प्रत्येकी रु. १ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोशल मीडियातून दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे अनुकरण अनेक गावांमध्ये करण्यात येत आहे. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या बसर्गे गावामध्येही त्यांच्या अंत्यसंस्कारापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रशांत जाधव यांच्या पत्नी पद्मा यांचं कुंकू पुसण्यात आले नाही, ते कायम आहे.

शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पश्चात पत्नी पद्मा, अवघ्या ११ महिन्यांची कन्या नियती, वडिल शिवाजी आणि आई रेणुका असा परिवार आहे. प्रशांत आठ वर्षांपूर्वीच म्हणजेच २०१४ मध्ये बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. त्यांचा पद्मा यांच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता. त्यांना अवघ्या ११ महिन्यांची नियती कन्या आहे.

अपघातग्रस्त बसमधून २६ जवान दहशतवाद्यांना चकवा देण्यासाठी खासगी बसने प्रवास करत असतानाच थोईसेपासून २५  किमी अंतरावर बसचा ताबा सुटला. त्यानंतर बस थेट नदीत कोसळली. दरम्यान, अत्यंत जखमी अवस्थेत जवानांना चंडीमंदीर येथील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ७ जणांना मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी जवानांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular