दिग्गज मुक्केबाज एमसी मेरी कॉम आणि हॉकी कर्णधार मनप्रीत सिह हे टोक्यो ऑलिम्पिक भारतीय संघाचे ध्वज्यवाहक म्हणून निवडले गेले आहेत. दोघे २३ जुलै रोजी होण्याऱ्या टोक्यो ऑल्पिक खेळाच्या उद्घाटना मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. ऑलिम्पिक खेळामध्ये भारताकडून पदकासाठी मुख्य दावेदरापैकी पैलवान बजरंग पूनिया हे ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निरोप समारंभामध्ये भारतीय ध्वजवाहक म्हणून भूमिका निभावणार आहेत.भारतीय ऑलिम्पिक संघाने या खेळाच्या आयोजन समितीला आपले निर्णय सांगितले आहे.
पहिल्यांदा अस झाले आहे की, ऑलिम्पिकमध्ये भारताकडून दोन ध्वजवाहक एक स्त्री आणि एक पुरुष आहेत.आयओए चे प्रमुख नरिदंर बत्रा यांनी टोक्यो ऑलिम्पिक मध्ये स्री पुरुष समानता असणार यांची माहिती दिली होती. २०१६ मध्ये रिओ डी जनेरियो इथे झालेल्या ऑल्पिक उद्घाटन समारंभात देशाचे एकमात्र व्यक्तीगत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांनी केले होते. कोरोना महामारीमुळे एक वर्ष स्थगित असलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १०० पेक्षा अधिक भारतीय खेळाडू भाग घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गेल्या वर्षी झालेल्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीमध्ये उद्घाटन समारंभात स्त्री आणि पुरुष ध्वजवाहक असतील यावर तरतूद केली होती.
एमसी मेरीकॉम ऑलम्पिक मध्ये पदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. मेरिकॉम ने लंडन ऑल्पिक २०१२ मध्ये ५१ किलोग्राम वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकले. मेरिकॉम च्या नावावर विश्व चैम्पियनशिप मध्ये सर्वाधिक पदक जिकण्याचा विक्रम आहे. तिने या गोष्टी मध्ये क्युबा चा पुरुष बॉक्ससर फेलिक्स सेवॉन याला मागे सोडले. ज्याच्या नावे विश्व चैम्पियनशिपमध्ये ०७ पदके आहेत. एमसी मेरीकॉमने आशिया ऑलिम्पिक क्लालिफायरच्या उपांत्य सामनामध्ये पोहचून टोक्यो ऑल्पिकसाठी निवड झाली. दुसऱ्या वेळी मेरिकॉम ने उपउपांत्य सामन्यांमध्ये फिलिपीसच्या आयरिश मैग्नो तर ५-० ने विजय मिळवून दुसर्यावेळी ऑलिम्पिक पात्र झाली. मेरिकॉम कडून पूर्ण देश टोक्यो ऑल्पिक मध्ये पदक जिकण्याची आशा बाळगुन आहे. स्वतः मेरिकॉमला पण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिकुण आपल्या कारकीर्द समाप्त करण्याची इच्छा आहे.
माझ्यासाठी हा क्षण खुप मोठा होणार आहे : मेरिकॉम
मेरीकॉम भारतीय ध्वजवाहकमध्ये निवड झाल्या नंतर पत्रकाऱ्याशी बोलताना सांगितले की हा क्षण माझ्यासाठी खुप मोठा आहे.कारण ही ऑलिम्पिक माझ्यासाठी शेवटची असेल. माझ्यासाठी हा क्षण भावनात्मक आहे. तिने सांगितले उद्घाटन समारंभात वेळी संघाची नेतृत्व करण्यास मिळाल्या बद्द्ल मी स्वतःला सन्मानित समजते आणि माझी निवड केल्याबद्दल क्रीडा मंत्रालय आणि आयओए ला धन्यवाद करते. हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मी पदक जिकण्यासाठी माझा सर्वश्रेष्ठ प्रयत्न करेन हे माझे वचन आहे.
हॉकी इंडिया च्या पत्रकार परिषदे मध्ये मनप्रीतने सांगितले की हे माझ्यासाठी खूप सुंदर आहे हे बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला अस वाटत की दिग्गज मेरी कॉम सोबत उद्घाटन समारंभात धव्यवाहक म्हणून निवडल्याबद्दल माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. त्याने सांगितले मी त्याच्या बॉक्सिंन कारकीर्दने नेहमी प्रेरित झाले आहे. हा क्षण माझ्या कारकीर्दचा मोठा क्षण आहे.हॉकीसाठी पण हा मोठा क्षण आहे. हॉकी संघाच्या कर्णधाराने सांगितल की या सुंदर क्षणासाठी मी भारतीय ऑलिम्पिक संघाने धन्यवाद करतो आणि मी टोक्यो ऑलिम्पिक उद्घाटनामध्ये आपली जबाबदारी निभावण्यासाठी वाट बघत आहे.