28 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeTechnologyनक्की काय आहे मास्क्ड आधार कार्ड!

नक्की काय आहे मास्क्ड आधार कार्ड!

मास्क्ड आधार कार्डावर सुरुवातीच्या ८ अंकावर क्रॉस केलेले असते. तर शेवटचे ४ नंबर केवळ सर्वाना दिसू शकतात.

आधार कार्ड सध्याच्या काळात अतिशय महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. बऱ्याच ठिकाणी आयडी प्रुफ म्हणून आधारकार्डच स्वीकारले जाते. सरकारी कामामध्ये तर आधार कार्डच्या नोंदीशिवाय काम पुढे सरकणे कठीणच बनले आहे.

बँकमध्ये खाते उघडण्यासाठी किंवा पासपोर्ट काढण्यासाठी, कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा अन्य कामाचा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्डमध्ये १२ अंकांचा एक युनिक नंबर आहे. या १२ अंकांमध्ये कार्डधारकाच्या ओळखीची संपूर्ण माहिती नोंदवलेली असते. आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचा दस्तऐवज असल्याने, त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. त्यामुळे आधार अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क्ड आधार कार्डची निर्मिती करण्यात आली आहे.

मास्क्ड आधार कार्डावर सुरुवातीच्या ८ अंकावर क्रॉस केलेले असते. तर शेवटचे ४ नंबर केवळ सर्वाना दिसू शकतात. मास्क्ड आधार कार्डचा एक विशेष फायदा आहे. तो म्हणजे, जरी तुमचे आधार कार्ड कुठे हरवले तरी कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही. तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड मास्क्ड आधार कार्डमध्ये रूपांतरित करून घेऊ शकता.

हे बदल ऑनलाईन करणे सुद्धा सहज शक्य आहे. ते कसं करायचं ते थोडक्यात जाणून घेऊया. मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी,  तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीची वेबसाइट uidai.gov.in वर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यापूर्वी आपला मोबाइल नंबर आधारशी लिंक केलेला आहे याची खात्री करुन घेणे. जर तुमचा मोबाईल क्रमांक UIDAI मध्ये नोंदणीकृत असेल तरचतुम्ही मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

असं करा मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड – सर्वप्रथम UIDAI च्या uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन, वेबसाइटवर ‘डाऊनलोड आधार’ या पर्यायावर क्लिक करणे. आता आधार – व्हीआयडी – नाव नोंदणी हा पर्याय सिलेक्ट करा, नंतर मास्क्ड आधार या पर्यायावर क्लिक करून तिथे आपली माहिती भरायची. यानंतर ‘Send OTP’  वर क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येतो, हा ओटीपी दिलेल्या जागी भरावे आणि submit वर क्लिक करावे.

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आणखी काही तपशील इथे भरावा लागेल. तपशील भरल्यानंतर डाउनलोड करण्याचे पर्याय दिसतील, ‘आधार डाउनलोड करा’ यावर क्लिक करा. आता तुम्ही तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

RELATED ARTICLES

Most Popular