24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiri'आभा' कार्ड देणार वैद्यकीय माहिती - डॉ. संघमित्रा फुले

‘आभा’ कार्ड देणार वैद्यकीय माहिती – डॉ. संघमित्रा फुले

या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी करावी. या कार्डमुळे संबंधिताचा वैद्यकीय इतिहास मिळणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात ही सुविधा सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांनी केले आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि तीही डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे.

सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्टस तपासून पाहावे लागतात. या सर्व बाबींचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठवली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठवली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार मी आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. कार्डसाठी आभा आधारकार्ड आणि आधारसंलग्न असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. आभा कार्डमुळे उपचार करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही. आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल.

RELATED ARTICLES

Most Popular