27.6 C
Ratnagiri
Monday, March 17, 2025

संगमेश्वरचे ग्रामीण रूग्णालयात अनेक पदे रिक्त…

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर कसबा नजिक ग्रामीण रूग्णालय...

काँग्रेसची जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपड…

जिल्ह्यावर १९७२ पासून अगदी १९९० पर्यंत काँग्रेस...

तीन वर्षांत मलेरियाचा एकही रुग्ण नाही…

जिल्ह्यातील १ हजार ३०३ गावे कीटकजन्य आजारमुक्त...
HomeRajapurदोन्ही समाजातील प्रतिनिधींची घेतली बैठक - आ. किरण सामंत

दोन्ही समाजातील प्रतिनिधींची घेतली बैठक – आ. किरण सामंत

शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.

राजापूर शहरासह राजापूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धुतपापेश्वर व नवलादेवी देवतांच्या होळ्या बुधवारी रात्री राजापूर शहरातून वाजत-गाजत धोपेश्वर मुक्कामी नेण्यात आल्या. मात्र शहरातील जवाहर चौक येथे होळी नाचवताना ही होळी जामा मशिदीच्या गेटपर्यंत घुसविण्याचा प्रयत्न काहीनी केल्याने काहीकाळ सामान्य तणाव निर्माण झाला होता. पोलीस यंत्रणांनी स्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर वातावरण सौम्य झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी दोन्ही समाजातील प्रतिनिधींची बैठक घेत शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र या घटनेमुळे शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी गुरूवाती तातडीने राजापुरात येत प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत राजापुरातील सलोखा कायम राखण्यासाठी सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.

इराला नागरिकांनीही प्रतिसाद दिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजापुरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एका स्ट्रायकिंग कोर्ससह एक आरपीसी प्लाटून, एक एसआरपी प्लाटून, दोन पोलीस निरीक्षक, आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४५ पोलीस हवालदार, बारा होमगार्डस अशी कुमक सध्या राजापुरात तैनात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular