25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeDapoliदापोलीत विद्यार्थ्याचा मानसिक छळ, तिघांवर ठपका

दापोलीत विद्यार्थ्याचा मानसिक छळ, तिघांवर ठपका

शेतकऱ्यांना विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची माहिती देतात.

येथील एका विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे प्रत्यक्ष शिक्षण शेतात घेता यावे यासाठी साडेचार महिने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांकडे पाठविले जाते. विविध गावांत राहून हे विद्यार्थी शेतीचे धडे घेतात.

शेतकऱ्यांना विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची माहिती देतात. अशाच ११ विद्यार्थ्यांचा एक गट रायगड जिल्ह्यातील गावात गेला होता. त्यातील एका विद्यार्थ्याला याच गटातील अन्य ३ सहकारी विद्यार्थी त्रास देत होते. या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास असल्याने त्याने सहकारी विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत घरी माहिती दिली नाही. त्याच्या या तीन सहकारी मित्रांनी गावात गेल्यावर तिसऱ्या दिवसापासूनच त्या मुलाला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याची लेखी तक्रार पीडित विद्यार्थ्यांन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे.

तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. त्यात सदस्य म्हणून डॉ. आनंद मयेकर (रावे कार्यक्रम प्रमुख), डॉ. जीवन आरेकर (कार्यक्रम अधिकारी), आर. एस. गुजर (सहायक कुलसचिव) यांचा समावेश आहे. या समितीने सर्व ११ विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली व मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या ३ विद्यार्थ्यांना अन्यत्र पाठविल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular