साताऱ्यातील जावळी तालुक्यातील बामणोलीजवळ अत्यंत दुर्गम भागातील सावरी या गावात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ तयार करणारा कारखाना पोलीस कारवाईत शनिवारी उघडकीस आला आहे. मुंबई आणि सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या या कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात. कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि यंत्रसामुग्री जप्त केली आहे. अत्यंत गोपनीयतेने करण्यात आलेल्या या कारवाईत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सातारा जिल्ह्यातील. कोयनेच्या.. खोऱ्यातील बामणोलीलगत असलेले सावरी हे गाव अत्यंत दुर्गम जागी वसलेले आहे. या गावात मेफेड्रोन हा अंमली पदार्थ तयार करणारा कारखाना छुप्या पद्धतीने सुरू असल्याबद्दलची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यावर मुंबई आणि सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या शनिवारी पहाटे या कारखान्यावर छापा टाकला. यामध्ये मुंबई गुन्हे अन्वेषण विभागासह सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या नेतृत्वाखाली मोठे पथक सहभागी झाले होते.
ही कारवाई केल्यावर या गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रोन हा अंमली पदार्थ तयार करणारा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी छापा टाकत येथे काम करत असलेल्या तीन कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच मेफेड्रोन (एमडी) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चामाल आणि यंत्रसामुग्री जप्त केली आहे. याची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. यापूर्वी मुंबई, पुणे, वर्धा येथे केलेल्या कारवाईत साताऱ्यातील या दुर्गम भागातही अशा प्रकारे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ तयार करणारा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खात्री केल्यावर त्यांनी आज शनिवारी पहाटे छापा टाकला. सावरी हे गाव सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या खोऱ्यातील बामणोलीलगत अत्यंत दुर्गम जागी वसलेले आहे. या गावात जंगलझाडीत एका पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रोन हा अंमली पदार्थ तयार करणारा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले.
या शेडमध्ये मेफेड्रोन (एमडी) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चामाल आणि यंत्रसामुग्री जप्त केली आहे. अत्यंत गोपनीयतेने करण्यात आलेल्या या कारवाईत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जावली तालुक्यातील सावरी गावात मेफेड्रोन (एमडी) तयार करणारा कारखाना पोलीस कारवाईत उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. या छाप्यात मेफेड्रोन तयार करण्याचे साहित्य आणि यंत्रसामुग्री जप्त केली आहे. या प्रकरणी तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.

