रविवारची गटारी अमावस्या पाऊस गाजविणारं अशी चिन्हे आहेत. रविवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी वर्तविली, आहे. रविवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता. शनिवारी सकाळपासून तशीच काहीशी परिस्थिती मुंबई शहरात दिसून आली. शुक्रवारी रात्रीपासून अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. रविवारीसुद्धा हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. म्हणजेच ४ जुलैला सुद्धा अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्यांच्या इशारानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, मुंबई या परिसरात रविवारी मुसळधार पाऊस कोसळेल या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर सातारा, पुणे ऑणि पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने थेट रेड अलर्ट दिला आहे..
रविवारी सुट्टीचा दिवस आहे. त्यातच अमावास्या आहे. या गटारी अमावस्येचे प्लॅन आखले आहेत. मात्र या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. कुलाबामध्ये ३७.८, सांताक्रूझमध्ये ४७.१, दहिसर ३२.०, राममंदिर ५०.५, विक्रोळी ५८.५, चेंबूर ३२.०, सायन ७८:० आणि माटुंगा ५७.० इतकी पावसाची नोंद हवामान वेधशाळेने केली आहे.