गुहागरचा पुढील आमदार हिंदूत्ववादीच असेल असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीला लागा, पुढील उमेदवाराला. कमी समजु नका आणि कामाला लागा अंशा सुचना देखील त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचे ५ अधिवेशन गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील श्री पूजा सभागृहात संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शक म्हणून आ. नितेश राणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे म ाजी प्रवक्ते मधुकर चव्हाण, माजी आ. सूर्यकांत दळवी, माजी आ.डॉ. विनय नातू, धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष केदार साठे, सुरेखा खेराडे, सौ. निलम गोंधळी, स्मिता जावकर, चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ. नितेश राणे म्हणाले, समोरच्या उमेदवाराला कधीच कमी समजू नये. मी निवडणुकीला सामोरे जाताना समोरचा उमेदवार किती ताकदीचा आहे, हेही पाहतो. आपण गाफील रहायचे नाही. रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य मिळाले नाही, आपण कुठे कमी पडत आहोत, याचा अभ्यास केला पाहिजे. विधानसभा निवडणुकीत ताकदीनिशी लढा असे आवाहन त्यांनी केले. सरकार योजना जाहीर करते मात्र, त्या जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय आपल्या सरकारचे आहे मात्र, तुम्ही जर ही योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविली नाहीत तर नको ते त्याचा गैरफायदा घेऊन मतदारांपर्यंत पोहचतील, त्यामुळे गाफील’ न राहता आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मेहनत घ्या, असे आवाहन राणे यांनी केले. विरोधकांवर मी टीका करेन, असे पत्रकारांना वाटले होते मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला असून हे सर्वकाही आम्ही निलेश राणे यांच्यावर सोपविल्याचे त्यांनी मिश्कील भाषेत सांगितले.
डॉ. विनय नातू म्हणाले, निलेश राणेंच्या एका सभेने आपल्यावर टीका, नकला करणाऱ्यांचे आवाज बंद झाले आहेत. आता नितेश राणेंचे पाठबळ आपल्याला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. मधु चव्हाण यांनी शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. धैर्यशील पाटील यांनी माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शासनाच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत कशा पोहचविल्या वं या बळावरच ते सातत्याने निवडून येत असल्याची आठवण करुन देऊन आपणही या योजना पोहचवून यश प्राप्त करा, असे आवाहन केले.