26.4 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraतुकाराम सुपेच्या घरून ८८ लाखांची रोकड जप्त

तुकाराम सुपेच्या घरून ८८ लाखांची रोकड जप्त

दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर होणार्या परीक्षा काही न काही कारणांमुळे रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. म्हाडा परीक्षा पाठोपाठ टीईटी च्या परीक्षेमध्ये पेपरफुटी झाल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना प्रचंड  त्रासाला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणी आता राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी म्हाडा पेपरफुटी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी टीईटी परीक्षेदरम्यान सुद्धा पेपरफुटी झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या प्रकरणामध्ये राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचे देखील नाव समोर आले. त्यांनी टीईटी परीक्षेदरम्यान आरोपींना मदत केल्याचा आरोपाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकारणी काल रात्री उशीरा त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. राज्यभर गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणी अजून कोणकोणती नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर असल्याने त्यांना, अटक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांना अटक झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

सायबर पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रीतीश देशमुख यांच्या घरी २०२० मध्ये टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळालेली. हा संपूर्ण घोटाळ्यात ४ कोटी २० लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला असून प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे लोक पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे उकळत होते. यातील तुकाराम सुपेच्या घरून तब्बल ८८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular