26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriगर्भवती महिलेला मारहाण, सहा महिन्यांचे बाळ दगावलं

गर्भवती महिलेला मारहाण, सहा महिन्यांचे बाळ दगावलं

सहा महिन्याच्या गर्भवती असल्याने त्यांना त्याचा प्रचंड त्रास जाणवू लागला. अशातच त्या खेड कळंबणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे सहा महिन्याचे बाळ दगावले.

मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील गर्भवती महिलेला पाच सहा जणांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आल्यामुळे तिचे सहा महिन्याचे बाळ दगावल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. संदर्भात मंडणगड पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, मरियम डावरे वय वर्ष ३४, रा. नवानगर म्हाप्रळ मोहल्ला यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादीमध्ये डावरे यांनी म्हटले आहे की, दि.२३ जुलै २०२२ रोजी म्हाप्रळ येथील फुरकान मुकादम, त्याची आई, जहूर मुकादम, हसमत काजी, फैजान मुकादम, अब्बास मुकादम या सहा जणांनी त्यांना मारहाण केली.

या वेळेला मरियम यांच्या पोटावर देखील मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे सहा महिन्याच्या गर्भवती असल्याने त्यांना त्याचा प्रचंड त्रास जाणवू लागला. अशातच त्या खेड कळंबणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे सहा महिन्याचे बाळ दगावले. याप्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात संबंधिता विरोधात भादवी कलम १४१, १४३, १४९, ३१५, ३१६, ५०४, ५०६, ३५४( ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलाजा सावंत करीत आहेत.

या महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांसमोरच हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी प्रत्यक्ष लक्ष घालावे व संबंधीत संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular