राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या जमावांने ‘अल्ला हो अकबर’चे नारे दिल्याने गुरुवारी मध्यरात्री रत्नागिरीत तुफान हंगामा झाला. अचानक जमाव समोर आल्याने स्वयंसेवकांचे संचलन थांबणार की काय अशी शंका उपस्थित होत असतानाच बंदोबस्ताला असलेल्या पोलीसांनी जमावाला दूर केले आणि संचलन नियोजित मार्गाने पुढे गेले. संचलन पुर्ण होताच शेकडो लोकांनी शहर पोलीस स्थानकावर धडक दिली. ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना अटक करा अशी मागणी करण्यात येत होती. हा सारा जमाव संतप्त होवून पोलीसांकडे कारवाईची मागणी करत असतानाच अचानक त्यातील काही जणांनी गाड्या बाहेर काढून पुन्हा एकदा कोकणनगरच्या दिशेने धाव घेतली.
मध्यरात्रीच्या सुमारास आक्रमक होत चाल करुन आलेल्या जमावाला काबूत आणण्यसाठी पोलीसांना लाठीचा प्रसाद द्यावा लागला. ही मात्रा लागू पडली आणि आक्रमक जमाव पांगला. दरम्यान या प्रकरणी जमावाच्या हल्ल्यात दोन तरुणांना मारहाण झाली असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे शहर पोलिस स्थानकात दाखल केले आहेत. संर्घाचे पारंपारिक संचलन प्रतिवर्षाप्रमाणे दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आयोजित करण्यात आले होते. गेली अनेक वर्षांची ही परंपरा आहे. या संचलनासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांची रितसर परवानगी घेण्यात आली होती.
शहरातील कदमवाडी ते चर्मालय मारुती मंदिर – शिर्के हायस्कूल असा मार्ग संचलनांसाठी निवडण्यात आला होता. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धो धो पाऊस कोसळत असताना देखील या संचलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेकडो लोकांनी शहर पोलीस स्थानकावर धडक दिली. ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना अटक करा अशी मागणी करण्यात येत होती. हा सारा जमाव संतप्त होवून पोलीसांकडे कारवाईची मागणी करत असतानाच अचानक त्यातील काहीजणांनी गाड्या बाहेर काढून पुन्हा एकदा कोकणनगरच्या दिशेने धाव घेतली.
मध्यरात्रीच्या सुमारास आक्रमक होत चाल करुन आलेल्या जमावाला काबूत आणण्यसाठी पोलीसांना लाठीचा प्रसाद द्यावा लागला. ही मात्रा लागू पडली आणि आक्रमक जमाव पांगला. दरम्यान या प्रकरणी जमावाच्या हल्ल्यात दोन तरुणांना मारहाण झाली असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे शहर पोलिस स्थानकात दाखल केले आहेत.
संर्घाचे पारंपारिक संचलन – प्रतिवर्षाप्रमाणे दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आयोजित करण्यात आले होते. गेली अनेक वर्षांची ही परंपरा आहे. या संचलनासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांची रितसर परवानगी घेण्यात आली होती. शहरातील कदमवाडी ते चर्मालय म रुती मंदिर – शिर्के हायस्कूल असा मार्ग संचलनांसाठी निवडण्यात आला होता. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धो धो पाऊस कोसळत असतानादेखील या संचलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने हे संचलन सुरु झाले.
अचानक गोंधळ – हे संचलन कोकण नगर येथून किर्तीनगर येथे आले असता त्याठिकाणी एका समाजाचा जमाव जमला होता. त्या जमावाने या संचलनात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला व अल्ला हो अकबरचे नारे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ उडाला. अल्ला हो अकबरचे नारे देणाऱ्या मंडळींचा या भागातून संचलन नेण्यास विरोध होता. जमावातील काही जणांनी येथून येयाचे नाय… जायचे नाय असे सांगितले.
जय श्रीरामचे नारे – दरम्यान अचानक रस्त्यावर आलेल्या जमावाने संचलनासमोर उभे राहत ‘अल्ला हो अकबर’चे नारे देण्यात सुरुवात करताच संघाच्या स्वयंसेवकांनी जय श्रीरामचे नारे दिले. उभय गटामध्ये तुंबळ घोषणायुद्ध सुरु झाले. काही प्रमाणात तू तू मैं मै देखील झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. संचलन थांबेल की काय अशी स्थिती दिसू लागली. मात्र पोलीसांनी संयमाने परिस्थिती हाताळली. घोषणा देणाऱ्या जमावाला दूर करत संचलन नियोजित मार्गाने पुढे पाठविले. नियोजितस्थळी म्हणजेच शिर्के हायस्कूल परिसरात या
संचलनाची सांगता झाली.
पोलिस स्थानकात जमाव जमला – संचलन पार पडल्यानंतर अड्थळा निर्माण करणाऱ्या व अल्ला हो अकबरचे नारे देणाऱ्या अटक करा अशी मागणी करत शुक्रवारी रात्री उशीरा मोठा जमाव रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाबाहेर एकवटला. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसह सकल हिंदू समाज आणि अन्य काही संघटनांचे कार्यकर्ते होते. शेकडोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी तेथेही मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली.
मध्यरात्री हंगामा – मध्यरात्री पोलीस स्थानकावर एकवटलेल्या जमावातील एक गट अचानक कोकणनगरच्या दिशेने रवाना झाला. दुचाकी, चारचाकी गाड्यांचे ताफ`च्या ताफे बाहेर पडले आणि घोषणा देत हा ताफा कोकण नगरला पोहोचला. त्याठिकाणी घोषणाबाजी झाली.
संतापाची लाट – अचानक कोकण नगर पोलिस चौकी शेजारील भागात जय श्रीरामच्या घोषणा सुरु झाल्या. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांची धावपळ सुरु झाली. जमाव अधिकच आक्रमक झाला होता. दरम्यान संचलनासमोर जमाव येत अल्ला हो अकबरचे नारे देताच पोलीसदल सतर्क झाले होते. त्यांनी तत्काळ अधिकचा बंदोबस्त मागविला होता. त्यानुसार दंगा काबू पथक कोकणनगरमध्ये दाखल झाले होते.
लाठ्यांचा प्रसाद दिला – कोकण नगर येथे मध्यरात्रीच्यासुमारास आलेल्या जमावाला पोलिसांनी सुरुवातीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी अखेर त्या जमावाला लाठ्यांचा सौम्य प्रसाद दिल्याचे कळते. ही मात्रा लागू पडली.
पळापळ सुरु – लाठ्यांचा प्रसाद मिळू लागताच जमावातील मंडळींची पळापळ सुरु झाली. पोलीसांनीदेखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रबळाचा वापर न करता परिस्थिती आटोक्यात राहिल यासाठी हे कडक पाऊल उचलले होते. प्रसादानंतर जमाव ओसरला. दरम्यान या ठिकाणी पोलीसांनी जमावातील काही आक्रम क तरुणांना ताब्यात घेतले आणि कोकणनगर येथील पोलीस चौकीत आणले.
पोलिसांच्या गाड्या धावल्या – पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस स्थानकात जमलेला जमाव पुन्ह कोकण नगरच्या दिशेने रवाना झाला त्यांना आवरण्यासाठी तात्काळ पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत कोकण नगरच्या दिशेने धावल्या.
चर्मालयात अडवले – कोकण नगरच्या दिशेने जाणाऱ्या या जमावाला चर्मालयात अडवले. यावेळी पोलिस आणि जमाव यांच्यात शाब्दिक चर्कमक झडली. पोलिसांनी फौजफाटा चर्मालय परिसरात तैनात केला होता. डीवायएसपी माईनकर स्वतः त्या परिसरात ठाण मांडून होते तर पोलिस निरीक्षक तोरस्कर हे जमावाला समजावण्याचा प्रयत्न करत होते.
दोघांना मारहाण – चर्मालय परिसरात जमाव आल्यानंतर दोन तरुण त्याठिकाणी आले. त्याठिकाणी बाचाबाची झाल्याने त्या दोन तरुणांवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर एक तरुण पळून गेला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्या तरुणाला देखील ताब्यात घेतले होते.
पोलीसांनी खडसावले – चर्मालय येथे जमलेला जमाव कोकण नगर येथे जाण्यासाठी प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात येत होता. पोलिस निरीक्षक तोरस्कर यांनी जमावाला चांगलेच खडसावले. कोणालाही कायदा हाती घेऊ देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.
दोन गुन्हे दाखल – या संपूर्ण प्रकरणात शहर पोलिस स्थानकात दोन गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन अडवून दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी रत्नागिरीचे माजी नगरसेवक मुसा काझी व इतर १० ते ११ जणांवर भारतीय न्यायसंहिता २३ चे कलम १९० (१), १९० (२), १९१ (१), १९२, १९५, १९६, ५७ महाराष्ट्र पोलिस कायदा अधिनियम ३७/१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद वरुण शामसुंदर पंडित यांनी शहर पोलिस स्थानकात दिल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.
दुसरा गुन्हा दाखल – दुसरा गुन्हा पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश कृष्णा पवार यांच्या तक्रारीवरुन दाखल झाला आहे. कोकणनगर पोलीस चौकीबाहेर जय श्रीरामच्या घोषणा देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवली आणि दोन तरुणांना मारहाण केली याप्रकरणी पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह इतर ३० ते ४० जणांविरुध्द भारतीय न्याय संहिता १८९ (२), १९०, १९१ (२), १९६, ११८, ५७ महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७/१३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.