26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedशासनाची लाखोंची रॉयल्टी बुडवली, खाडीपट्ट्यात वाळू चोरटे जोमात

शासनाची लाखोंची रॉयल्टी बुडवली, खाडीपट्ट्यात वाळू चोरटे जोमात

पावसाळ्यात चोरटी वाळू उत्खनन करणाऱ्यांनी आता आपला मोर्चा शासनाची चोरी करण्याकडे लावला आहे.

तालुक्यातील खाडीपट्टा विभागामध्ये भरपावसाळ्यात वाळू चोरट्यांनी वाळू चोरण्याचा चांगला सपाटा लावला आहे. याबाबत मात्र प्रशासन कोणतीच भूमिका घेताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शासनाकडून अद्याप वाळू करण्यात आलेली नसताना खेड लिलावाची कोणतीच प्रक्रिया पूर्ण खाडीपट्टा विभागातील कोतवली वाशिष्टी नदी आणि जगबुडी नदीदरम्यान गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने वाळू उत्खनन होत आहे. ही वाळू खेड खाडीपट्ट्यातील करजी परिसरामध्ये उतरवली जात आहे. तसेच वाळूनी भरलेल्या बोटी या समुद्र मार्गाने दापोली तालुक्यातील उन्नवरे फरारे परिसरामध्ये आणून त्या ठिकाणीदेखील खाली केली जात आहे.

त्यामुळे शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली जात आहे. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात चोरटी वाळू उत्खनन करणाऱ्यांनी आता आपला मोर्चा शासनाची चोरी करण्याकडे लावला आहे. या वाळूंनी भरलेल्या गाड्या दिवसभर रस्त्याने धावताना सर्वसामान्य नागरिकांना दिसत आहेत. करजी येथील वाळू उपशाचा परवाना पावसाळ्यापूर्वी संपलेला असताना ही जगबडी नदीपात्रात रात्रीच्या काळोखात बिनबोभाटपणे सुरू असलेला वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याची तपासणी तहसीलदार यांनी करावी आणि या वाळू माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular