22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeSindhudurgना. नितेश राणेंनी मेहनतीने 'मान्यवरांना' पकडले, मात्र सारे २ तासात बाहेर आले!

ना. नितेश राणेंनी मेहनतीने ‘मान्यवरांना’ पकडले, मात्र सारे २ तासात बाहेर आले!

मतदार संघातच खुल्लमखुल्ला मटका अड्डा सुरु होता.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे मत्स्योद्योगमंत्री ना. नितेश राणे यांनी गुरुवारी जबरदस्त ‘कर्तबगारी’ दाखवली. ना. नितेश राणेंची मेहनत खुद्द कणकवली शहरात म्हणजे ना. नितेश राणे यांच्या मतदार संघातच खुल्लमखुल्ला मटका अड्डा सुरु होता.. बिचाऱ्या पोलिस खात्यातील मंडळींना त्यांच्या दैनंदिन धबडग्यात तिकडे लक्ष देता आले नसावे किंवा असा काही अड्डा सुरु असावा याची त्यांना सुतराम ‘खबर’ मिळाली नसावी.. परंतु काही का असेना सारी उणीव खुद्द मंत्री महोदयांनी भरुन काढली. त्यांनी जबरदस्त मेहनत घेतली.. गुप्तता पाळली.. या कानाचे त्या कानाला कळू दिले नाही आणि अचानक ‘मान्यवरां’वर धाड पडली.

‘मान्यवर’ तयारीचे! – खुद्द मंत्री महोदय समोर येऊन उभे ठाकताच ‘मान्यवर’ विलक्षण चक्रावले असावेत असे व्हिडीओ पाहणाऱ्यांना वाटले असावे. परंतु एकूण त्यांचा अविर्भाव पाहता ते आश्चर्य चकीत झाल्याचे जराही जाणवले नाही. ‘मान्यवर’ शांतपणे आपापल्या खुर्चीत बसून आपापले काम ‘इमाने इतबारे’ पूर्ण करत असल्याचे सर्वत्र प्रसृत झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येते. खरे तर सारे मान्यवर’ अशावेळी गांगरुन जाणे अपेक्षित होते. मंत्री महोदयांनी त्यांना ‘रंगेहात’ पकडले आणि पोलिसांना बोलवून त्यांच्या स्वाधीन केले.

अद्याप उलगडा नाही! – व्हिडीओ पाहून काही गोष्टी चटकन लक्षात येतात पोलिस आले.. समोर मंत्री महोदय उभे होते.. तरीही पोलिस झपाट्याने ‘मान्यवरां’ना ताब्यात घेताना व्हिडीओत दिसले नाही. उलट पोलिस मंडळींसमोर आणि मंत्री महोदयांसमोर ‘मान्यवर’ आपापल्या खुर्चीवर रुबाबात बसून होते.. हे कसे काय? याचा उलगडा आजता गायत मालवणी मुलूखातील मंडळींनाच नव्हे तर सिंधुदुर्ग पासून मुंबई पर्यंतच्या सर्वांनाच झालेला नाही.

मंत्री महोदयांचे अफाट कष्ट ! – मंत्री महोदयांनी अफाट कष्ट घेतले.. सर्व प्रथम त्यांनी शांतपणे माहिती गोळा केली असणार.. त्यानंतर ते धडाडीने ‘मान्यवरां’च्या ठिकाणावर जाऊन धडकले.. त्यांनी दमात घेऊन विचारणा केली.. आणि मग पोलिसांना बोलावून सर्व ‘मान्यवरांना’ पोलिसांच्या ताब्यात दिले. इतकी सर्व मेहनत मंत्री महोदयांनी घेतली परंतु त्यांच्या मेहनतीचे ‘चीज’ झाले का? असा प्रश्न आता मालवणी मुलूखात गावा गावात व नाक्या नाक्यावरील चर्चेत खुलेआम विचारला जात आहे.

हे सर्व कसे घडले? – मालवणी मुलूखातील आणखी एक दिग्गज नेते व भूतपूर्व आमदार श्री. वैभव नाईक यांनी नेमका प्रश्न उपस्थित केला आहे. मंत्री महोदयांनी इतकी मेहनत घेतली आणि सर्व ‘मान्यवर’ केवळ २ तासात सुटले हे कसे काय? ही ‘कृपा’ परमेश्वराची म्हणावी की पोलिसांची म्हणावी असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. पोलिसांनी एवढे सर्व झाल्यानंतर मामला ‘टाईट’ करायला हवा होता परंतु मामला ‘लूज’ ठेवला गेल्याने हे सर्व घडले का? याची खमंग चर्चा आता सर्वत्र जनतेत रंगली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular