23.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...

चिपळुणात कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर…

कोकणातील भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन त्या क्षमतेच्या...
HomeRatnagiriमंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मारूती मंदिर सर्कल येथून जयस्तंभपर्यंत विजयी मिरवणूक काढली जाणार आहे

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२) रत्नागिरीत दणक्यात स्वागत होणार आहे. सायंकाळी ४ वाजता शहरातील मारूती मंदिर सर्कल येथून जयस्तंभपर्यंत डीजे, ढोलताशे, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी करत दणक्यात विजयी मिरवणूक काढली जाणार आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेऊन नियोजन केले. गेली २० वर्ष आमदार, मंत्री, पालकमंत्री म्हणून रत्नागिरीकरांसाठी कार्यरत असताना उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली. रत्नागिरीची शैक्षणिक हब म्हणून ओळख निर्माण झाली. उद्योगमंत्री म्हणून कार्यरत असताना सामंत यांच्या प्रयत्नामुळेच जिल्ह्यामध्ये ३ नवीन कंपन्या आल्या. त्यापैकी २ कंपन्या रत्नागिरी मतदार संघामध्ये आल्या.

रत्नागिरी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आता उद्योगक्षेत्रावर एक वेगळीच ओळख निर्माण करत आहे. मतदारसंघात पाचव्यांदा विजय मिळवल्यानंतर सामंत यांना तातडीने मुंबईला जावे लागले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लागलीच हिवाळी अधिवेशनाला नागपूरला गेले. २२ डिसेंबरला ते रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सर्व कार्यकर्ते नियोजन करत आहेत. विजयी मिरवणूक काढून सामंत यांचे जल्लोषात स्वागत होणार आहे. या मिरवणुकीमध्ये सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, मित्रमंडळी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

सामंतांना उद्योग, तर कदमांना पर्यटन खाते ? – महायुतीच्या सरकारचा शपथविधी झाला असला तरी खातेवाटपाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे अजूनही कोणत्या मंत्र्याला कोणत्या खात्याची जबाबदारी दिली आहे, हे जाहीर झालेले नाही. सामंत यांनी उद्योग मंत्रिपदाला मोठ्या उंचीवर नेले. त्यामुळे त्यांना पुन्हा उद्योगखाते मिळण्याची शक्यता आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांना पर्यटन राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांकडून याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र, अधिकृत घोषणेनंतरच चित्र स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES

Most Popular