रत्नागिरी शहरामध्ये एका मिरजोळयातील तरुणाला विनाकारण मारहाण करण्यात आली आहे. हल्ली कोणत्याही शुल्लक कारणावरून तरुणाईतील सळसळते रक्त लगेच गरम होते आणि मागचा पुढचा काही विचार न करता, हि तरुण मुल मारामारी, हल्ले अशा नको त्या गोष्टींकडे वळतात. शहरातील डी.एस. भोसले प्लाझासमोर अज्ञात कारणावरुन मिरजोळे येथील तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करणार्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रसाद शिवगण वय ३२, रा. मिरजोळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद १६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.१५ वाजता डी.एस.भोसले प्लाझाजवळ उभा असताना तिथे आलेल्या दोघा व्यक्तींनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.
आणि विनाकारण हुज्जत घालत असतानाच त्या दोघामधील एकाने त्याच्या कडे असलेल्या लोखंडी रॉडने प्रसाद शिवगण याला बेछुट मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रसाद यांनी त्याला प्रतिकार केला, परंतु त्यातील एकाने प्रसादला घट्ट पकडले आणि दुसर्याने लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. या झटापटीत प्रसाद याच्या उजव्या हाताला दुखापत झाली.
मारहाण करून झाल्यावर त्यांनी त्याला तिथेच सोडून दिले आणि आसपासच्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या संदर्भात दोघा अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी शहर पोलिसांनी भोसले प्लाझासमोर जाऊन पंचनामा केला. दोघा संशयितांचा शोधण्यासाठी एक पथक निर्माण करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करीत आहेत. नक्की या मारहाणीमागे काय कारण आहे त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.