31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

रत्नागिरी, खेड, दापोली आगारांना लवकरच मिळणार इलेक्ट्रीक बस

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एस.टी. डेपोंना...

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...
HomeRatnagiriजेएसडब्ल्यू पोर्टच्या जेटीसंदर्भातील मागण्या मान्य होत नसल्याने मच्छिमारांचे  उपोषण

जेएसडब्ल्यू पोर्टच्या जेटीसंदर्भातील मागण्या मान्य होत नसल्याने मच्छिमारांचे  उपोषण

मच्छीमारी नौका जे.एस.डब्ल्यू जयगड पोर्टच्या धामणखोल बंदरात समुद्रात उभ्या केल्या आहेत.

जे.एस.डब्ल्यू जयगड पोर्टच्या मिरवणे जेटीसंदर्भात मच्छीमारांनी केलेल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर जयगड येथील मच्छीमारांनी शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. प्रशासाकडून न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. नौका बंदरात उभ्या करून मच्छिमारांनी आंदोलनात उतरले आहेत. जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सदस्यांनी हे आमरण उपोषण सुरु केले आहे. जे. एस. डब्ल्यू जयगढ़ रवणे जेटीच्याविरोधात मच्छीमारांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. याबाबत स्थानिक मच्छीमारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले होते.

त्यानंतर कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. पालकमंत्र्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीनंतर मच्छीारांच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिले नाही, असा मच्छिमारांचा दावा आहे. म ागण्या मान्य होत नसल्याने २६ जानेवारीला मच्छीमारांनी आंदोलन केले, परंतु त्याकडेही कंपनी व जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले, अशी माहिती उपोषणकर्त्या मच्छिमारांच्यावतीने देण्यात आली. मागील काही दिवस स्थानिक मच्छीमार हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून प्रयत्नशील होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर ९ फेब्रुवारीपासूनं आमरण उपोषण कंपनीच्या गेटसमोर सुरु केले आहे.

मच्छीमार संस्थेच्या सभासदांनी सर्व मच्छीमारी नौका जे.एस.डब्ल्यू जयगड पोर्टच्या धामणखोल बंदरात समुद्रात उभ्या केल्या आहेत. मच्छीमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत या नौका धामणखोलमध्येच उभ्या ठेवण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. जयगडमधील संपूर्ण मासेमारी बंद ठेवण्याबरोबरच मासळी सेंटरही बंद ठेवण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे.जे.एस.डब्ल्यू पोर्टच्या गेटसमोर रिजवान वाडकर, यासीन होडेकर, अनिस आडूरकर, हासरत जांभारकर, सफदर संसारे, जमील कुंबे, साजिद वाडकर, मुंतजर डांगे, झुबेर सांगरे, समीर मुजावर, मुजाहिद खले, साजिद डांगे, इरफान डांगे, जिक्रीया मुजावर हे जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद आमरण उपोषणाला बसले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular