21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiriनळपाणी योजनेवर ग्रामस्थ नाराज, वरवेली ग्रामपंचायत

नळपाणी योजनेवर ग्रामस्थ नाराज, वरवेली ग्रामपंचायत

ठेकेदाराला सूचना देऊनही शक्ती पॉलिमर या कंपनीचे पाईप वापरण्यात येत आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात चालू असलेल्या नळपाणी योजनेतील समस्यांबद्दल वरवेली ग्रामस्थांच्यावतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वरवेली कार्यक्षेत्रात जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी तत्कालीन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची भेट घेऊन वरील योजनेंतर्गत जैन इरिगेशन कंपनीचे पाईप वापरण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या समक्ष भेटीमध्ये जैन इरिगेशन पाईपलाईन टाकण्याचे मान्य करण्यात आले. ठेकेदाराने आणलेल्या शक्ती पॉलिमर कंपनीऐवजी जैन इरिगेशन कंपनीचे पाइप वापरण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार ठेकेदार याने जॅकवेलपासून साठवणूक टाकीपर्यंत जैन इरिगेशन कंपनीचे चार इंच साइजचे पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तथापि, आता नळधारकांना पाणीपुरवठ्याबाबत उपयोगात आणावयाचे पाईपलाईन शक्ती पॉलिमर या कंपनीची वापरावी लागेल, असे सरपंचांनी सांगितले. गावातील काही लाभधारकांनी पाणीटंचाई होऊ नये म्हणून नाइलाजास्तव शक्ती पॉलिमर कंपनीचे पाईप टाकण्यास संमती दिलेली आहे; परंतु बहुतांश ग्रामस्थ या विरोधात असून आम्हाला जैन इरिगेएशन कंपनीचे पाईप या कामी हवे आहे. तशी आमची मागणी आहे.

ठेकेदाराला सूचना देऊनही शक्ती पॉलिमर या कंपनीचे पाईप वापरण्यात येत आहे. ठेकेदाराला नियमाप्रमाणे तीन फूट खोल पाईप टाकण्याच्या सूचना असूनही अनेक ठिकाणी पाईप कमी खोदाई करून टाकण्यात आले आहेत. मराठवाडी भागात रस्त्याशेजारी गटारातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे तसेच शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या गटारातील भाग फोडून पाईपलाईन वरचेवर टाकण्यात आली आहे.

ठेकेदाराला सूचना देण्याची मागणी – ठेकेदार वारंवार सूचना देऊनही ते कधीही कामाच्या ठिकाणी व ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत. गावातील अडीअडचणी दूर करून अंतर्गत लाईन करता जैन इरीगेशन कंपनीचे पाईप वापरण्याबाबत ठेकेदारांना सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular