27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeRatnagiriडेंजरझोनमधील मिऱ्या बंधाऱ्याचे काम ठप्प

डेंजरझोनमधील मिऱ्या बंधाऱ्याचे काम ठप्प

भाटकरवाडा ते जयहिंद चौक या सुमारे १२00 मीटरच्या टप्प्याचे काम थांबले आहे.

पावसाचा हंगाम तोंडावर आला असला तरी डेंजरझोनमध्ये असलेल्या मिऱ्या बंधाऱ्याचे सुमारे १२०० मीटरच्या महत्त्वाच्या टप्प्याचे काम थांबले आहे. त्यामुळे पावसाळ्यात धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. त्या अनुषंगाने  नुकतीच महत्त्वाची बैठक असून, येत्या आठ दिवसांमध्ये या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पत्तन विभागाने दिली. त्यामुळे मिऱ्यावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या सुमारे साडेतीन किमीच्या बंधाऱ्यामुळे या भागातील अनेक गावांचे संरक्षण होणार आहे. पावसाळ्यातील समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होऊन समुद्र ग्रामस्थांच्या सातबारावर आला आहे.

मिऱ्यावासीयांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर शासनाने हा बंधारा मंजूर केला. सुमारे १५० कोटी रुपयांचा हा धूपप्रतिबंधक बंधारा आहे. यासाठी मंत्री उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले होते. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा दोन वर्षात पूर्ण करायचा अवधी आहे. तरी तो पूर्ण झालेला नाही. या दरम्यान ठेकेदाराला ४ वेळा दंडात्मक कारवाई झाली आहे. सुमारे ८० टक्के बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. पत्तन विभागाने केलेल्या सव्र्व्हेनुसार, ७ डेंजर टप्पे यामध्ये सुरक्षित करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक डेंजर महत्त्वाचा टप्पा शिल्लक आहे.

स्थानिक ग्रामस्थ, ठेकेदार बैठक – भाटकरवाडा ते जयहिंद चौक या सुमारे १२०० मीटरच्या टप्प्याचे काम थांबले आहे. येत्या पावसाळ्यात या भागालाच जास्त धोका आहे. वेळेत बंधाऱ्याचे काम न झाल्यास वस्तीत पाणी शिरण्याचा धोका आहे. ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वीच याबाबत स्थानिक ग्रामस्थ, ठेकेदार आणि पत्तन विभागाची बैठक झाली. या बैठकीध्ये आठ दिवसात या टप्प्याचे काम करण्याचा निर्णय झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular