27.9 C
Ratnagiri
Sunday, August 10, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या 'लम्पी...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...
HomeRatnagiriबेपत्ता विवाहितेचा मृतदेह, २०० फूट खोल दरीत मिळाल्याने खळबळ

बेपत्ता विवाहितेचा मृतदेह, २०० फूट खोल दरीत मिळाल्याने खळबळ

मृतदेहाचा चेहरा ओळखणे कठीण असून शरीरावरील कपड्यांनी ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

रत्नागिरी शहरातील बेपत्ता झालेल्या तन्वी घाणेकर वय ३३,  रा. खालचा फगरवठार, रत्नागिरी या विवाहितेचा मृतदेह भगवती किल्ल्यासमोरील कपल पॉइंट खाली २०० फूट खोल दरीत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

रत्नागिरी शहरालगतच्या भगवती बंदर येथील कडेलोट पॉइंट येथून सुमारे दोनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे जिकरीचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. घटना स्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

बेपत्ता तन्वी घाणेकर यांची दुचाकी देखील भगवती बंदर या ठिकाणी आढळून आली होती. या पार्श्वभूमीवर सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मृतदेहाचा चेहरा ओळखणे कठीण असून शरीरावरील कपड्यांनी ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी गुरुवार २९ सप्टेंबर रोजी तन्वी घाणेकर बाजारात जाऊन येते सांगून, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ती घरी न परतल्याने पती रितेशने ३० सप्टेंबरला शहर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. याप्रकरणी अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

सायंकाळी उशिरापर्यंत माउंटेनिअर्स असोसिएशनच्या पथकाच्या मदतीने तिचा मृतदेह रॅपलिंगच्या सहाय्याने प्लास्टिक पिशवीत बांधून स्टेचर वर टाकून तो दरीतून बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान घातपताच्या शक्यतेने या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular