26.6 C
Ratnagiri
Tuesday, November 25, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunकोकणात वाशिष्ठी प्रकल्प साकारणाऱ्या प्रशांत यादवांचे आमदार भास्कर जाधवांकडून कौतुक

कोकणात वाशिष्ठी प्रकल्प साकारणाऱ्या प्रशांत यादवांचे आमदार भास्कर जाधवांकडून कौतुक

वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा प्रकल्प कोकणातील दुग्ध व्यवसायाला निश्चितच मोठ्या प्रमाणात चालना देणारा असा प्रकल्प आहे. त्यामुळे आपल्या कोकणातील आपला प्रकल्प, या भावनेने सर्वांनी मिळून वाशिष्ठी डेअरीचा हा प्रकल्प मोठा करूया, असे आवाहन करत या प्रकल्पाला माझे पूर्णपणे सहकार्य राहील, असे आश्वासन माजी मंत्री तथा शिवसेनेचे (ठाकरे गट) गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी दिले. गुहागरचे आमदार जाधव आणि त्यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी शुक्रवारी सकाळी वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. च्या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक तथा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी जाधव पिता-पुत्रांचे स्वागत केले.

यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी वाशिष्ठी डेअरीच्या प्रकल्पाची विस्तृत माहिती जाणून घेतली. कोकणातील दुग्धोत्पादन क्षेत्राला उर्जितावस्था देणारा हा अत्याधुनिक प्रकल्प निश्चितच कोकणचा आर्थिक स्तर उंचावेल, अशा शब्दांत त्यांनी प्रकल्पाबाबत गौरवोद्गार काढले आणि प्रशांत यादव यांना वाशिष्ठी डेअरीचा पेढा भरवत प्रकल्प सहकार्य राहील, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. यावेळी वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संचालक मॅनेजर प्रदीप मगदूम, मार्केटिंग मॅनेजर जितेंद्र पाटील, अकाउंट मॅनेजर विठ्ठल धामणकर, एरिया सेल्स मॅनेजर तानाजी निंबाळकर, वाशिष्ठी डेअरीचे इतर उभारण्याचे धाडस केल्याबद्दल कौतुक केले. वाशिष्ठी डेअरीला माझे संपूर्णपणे महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular