28.2 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeSindhudurgरस्त्यांच्या दुरुस्तींच्या कामाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची मनसेकडून खरडपट्टी

रस्त्यांच्या दुरुस्तींच्या कामाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची मनसेकडून खरडपट्टी

तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तींच्या कामाबाबत चालढकल करणाऱ्या तसेच विविध प्रश्नांची सरबत्ती करत मनसे कुडाळ शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तींच्या कामाबाबत चालढकल करणाऱ्या तसेच विविध प्रश्नांची सरबत्ती करत मनसे कुडाळ शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कामे सदोष पद्धतीने केल्याने ती किती काळ टिकणार?, रस्त्यांच्या साईडपट्या कधी दुरुस्त करणार?, पावसाळा आता तोंडावर आला असून, रस्त्यांची गटारे व ड्रेनेज यंत्रणा साफ सफाई कधी करणार?, सदोष पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून मोबाईल कंपन्यांनी केबल जोडणी करत असताना, साईडपट्टी दुरुस्तीसाठी देण्यात आलेला निधी परस्पर गिळंकृत करण्यात आला आहे, असा आरोप केला आहे. तेही पत्रक यावेळी सादर करण्यात आले. पत्रकात श्री. गावडे यांनी म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील कुडाळ-पाट, कुडाळ-वेंगुर्ले, वेताळ बांबर्डे-गोठोस, घावनळे-आंबडपाल या मार्गांची कामे पूर्णतः निकृष्ट दर्जाची असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ वेळखाऊ धोरण अवलंबत असून, कारवाईची आश्वासने देत चालढकलपणा करीत आहे.

या विभागातील वरिष्ठ अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमताने आर्थिक घोळ केल्याचा खळबळजनक आरोप देखील करत, मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. अपघात होऊन माणसे जखमी होत आहेत तरी अधिकारी सुस्त कसे? रस्त्याच्या साईडपट्टीची कामे पावसाळ्यापूर्वी झाली पाहिजेत ती कधी होणार? निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का नाही? आदी प्रश्नांचा भडीमार करीत मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

उपअभियंता श्री. चव्हाण यांनी २० मे पूर्वी नादुरुस्त बाजूपट्टी दुरुस्त होतील,  अर्थवट राहिलेली कामे देखील लवकरात लवकर पूर्ण केली जातील, २२ मे नंतर मनसे पदाधिकारी व बांधकाम अधिकारी रस्त्यांची संयुक्त पाहणी करतील, अशी ग्वाही दिली;  मात्र यावेळी मनसेने बांधकाम विभागाला शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा देत रस्त्यांची अवस्था सुधारा अन्यथा मनसेची गाठ असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular